दहा वर्षांनंतर कोल्हापूरात पुन्हा महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

दहा वर्षांनंतर कोल्हापूरात पुन्हा महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

कोल्हापूर - महापालिकेच्या वतीने शाहू खासबाग मैदानात ५ ते ८ डिसेंबर या कालावधीत महापौर चषक कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या आहेत. स्पर्धेतील पहिल्या क्रमाकांचा मानकरी ठरणाऱ्या विजेत्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. या निमित्ताने पंजाबचा मल्ल हिंदकेसरी कमलजितसिंह व कोल्हापुरातील मोतीबाग तालमीचा मल्ल भगवंत केसरी बारारफिक शेख यांच्यात निकाली कुस्ती होणार असल्याची माहिती महापौर हसीना फरास यांनी पत्रकारांना दिली. या वेळी प्रथमच मुलींच्याही कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापौर म्हणाल्या, ‘‘महापालिकेच्या वतीने पूर्वी महापौर केसरी स्पर्धा भरविण्यात येत होत्या; मात्र गेल्या दहा वर्षांत त्यामध्ये खंड पडला होता. दहा वर्षे ही स्पर्धा झाली नव्हती. ती पुन्हा सुरू करत आहोत. कोल्हापूर जिल्हा तालीम संघ, महाराष्ट्र राज्य तालीम संघ यांच्या मान्यतेने ही स्पर्धा भरविण्यात येत आहे. स्पर्धेत पुरुष तसेच महिलांच्याही कुस्त्या होणार आहेत. ८६ किलो वजन गटावरील खुल्या गटात महापौर केसरी स्पर्धा होईल. महिला महापौर केसरीची स्पर्धा ६० किलो वजन गटावरील मल्लांमध्ये होईल. त्यासाठी रोख ५० हजार रुपयाचे बक्षीस ठेवले आहे. पुरुषांमध्ये वजनानुसार सहा गटांत, तर महिलांची ३ गटांत स्पर्धा होणार आहे. पुरुषांची ५७ किलो वजन, ६१, ६५, ७४ व ८६ किलो वजनी गटात स्पर्धा घेण्यात येणार आहे. यातील पहिल्या क्रमांकाच्या विजेत्यांना १० हजारांपासून ३१ हजारांपर्यंतची रोख बक्षीस देण्यात येतील. ५७ किलो गटातील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे, दहा, सात व पाच हजार रुपये, ६१ किलो गटातील विजेत्यांना बारा, आठ व सहा हजार रुपये, ६५ किलो वजनगटासाठी पंधरा, दहा व सात हजार रुपये, ७४ किलो वजन गटासाठी वीस, पंधरा व दहा हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे. ८६ किलो वजन गटातील विजेत्यांना अनुक्रमे ३१ हजार, २० हजार व १५ हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे. ८६ किलो वरील खुल्या गटात महापौर केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार आहे. पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला रोख दोन लाख रुपयाचे बक्षीस ठेवले आहे. द्वितीय क्रमांकासाठी १ लाख, तर तिसऱ्या क्रमांकासाठी ५० हजार रुपये बक्षीस आहे. महिलांसाठी ५५ किलो, ६० किलो व ६० किलो वरील असे तीन गट आहेत. पहिल्या गटातील विजेत्यांना रोख दहा, पाच व तीन हजार रुपये, तर ६० किलो वजन गटातील विजेत्यांना १५ हजार, ७ हजार व ५ हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. ६० किलो वरील वजन गटात महापौर केसरी स्पर्धा घेण्यात येईल. यातील विजेत्यांना रोख ५० हजार, २५ हजार व तिसऱ्या क्रमांकाला १५ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com