अँडी मरे बन गया नंबर 1

अँडी मरे बन गया नंबर 1

पॅरिसमध्ये सुरू असलेल्या एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या अँडी मरे याने अंतिम फेरी गाठली, तर नोव्हाक जोकोविच उपांत्यपूर्व फेरीतच हरला. त्यामुळे अँडी मरेचा अव्वल क्रमांकापर्यंतचा प्रवास सुकर झाला. अर्थात मरे या किताबासाठी सर्वार्थाने पात्र आहे. गेल्या १२ महिन्यांच्या कालाधीत त्याने कमालीचे सातत्य राखले. आई ज्यूडी यांच्या मार्गदर्शनाखाली टेनिसचा श्रीगणेशा गिरविलेल्या मरेची कामगिरी टेनिसजगतात कौतुकाचा विषय ठरली आहे. 

विजेतेपदासह अव्वल क्रमांकाचा जल्लोष
मरेने पॅरिस मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या जॉन इस्नरला ६-३, ६-७ (४-७), ६-४ असे हरवून अव्वल क्रमांकाचा विजेतपदासह जल्लोष केला. 
 

प्रारंभी ग्रॅंड स्लॅम विजेतेपद जिंकावे, असे मला नेहमीच वाटायचे. आता माझे वय वाढले आहे. त्यामुळे मी अव्वल क्रमांकासाठी सुद्धा प्रयत्न केला. गेल्या दोन मोसमांत मी सातत्य उंचावले. त्यामुळे मला या कामगिरीचा फार आनंद आणि अभिमानसुद्धा वाटतो.
- अँडी मरे

अँडी तुझे अभिनंदन, आपल्या खेळात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या टेनिसपटूंच्या छोट्याशा क्‍लबमध्ये तुझे स्वागत असो.

- बोरिस बेकर, 

आपल्या टेनिसनगरीत नव्या राजाचा उदय झाला आहे. सर अँडी मरे, आपले अभिनंदन.

- रॉजर फेडरर

अँडी मरेसाठी अत्यंत सार्थ अशी कामगिरी. तो अव्वल क्रमांकापर्यंत गेला याचा आनंद वाटतो. दीर्घ काळापासून याची प्रतीक्षा होती.

- अँडी रॉडिक,
 

  • जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळविलेला एकूण २६वा आणि ब्रिटनचा पहिलाच टेनिसपटू
  • नोव्हाक जोकोविच याची सलग १२२ आठवड्यांची अव्वल क्रमांकावरील मालिका संपुष्टात
  • अव्वल क्रमांक मिळविणारा २९ वर्षांचा मरे सर्वाधिक वयाचा दुसऱ्या क्रमांकाचा टेनिसपटू
  • यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे जॉन न्यूकोम्ब वयाच्या ३०व्या वर्षी जून १९७४ मध्ये अव्वल.
  • मरे १७ ऑगस्ट २००९ रोजी दुसऱ्या क्रमांकावर. त्यानंतर सात वर्षांनी त्याची अव्वल क्रमांकापर्यंत मजल.
  • या कालावधीत सात वेळा आणि एकूण ७६ आठवड्यांच्या कालावधीत तो दुसऱ्या क्रमांकावर
  • व्यावसायिक कारकिर्दीच्या १२व्या मोसमात ही भरारी
  • बिग फोर अशी गणना होणाऱ्या आजघडीच्या इतर तीन टेनिसपटूंच्या पंक्तीत विराजमान.
  • फेडरर ३०२ आठवडे, जोकोविच २२३, तर नदाल १४१ आठवडे अव्वल क्रमांकावर
  • गेल्या १२ महिन्यांत मरेचे ७६ विजय आणि ११ पराभव.
  • ११ स्पर्धांत अंतिम फेरी गाठताना सात विजेतिपदे
  • या वाटचालीत इव्हान लेंडल या तत्कालीन झेकोस्लोव्हाकियाच्या माजी टेनिसपटूंचे मार्गदर्शन बहुमोल. लेंडल स्वतः २७० आठवडे अव्वल क्रमांकावर होते, पण ते एकदाही विंबल्डन जिंकू शकले नाहीत. त्यांना सुपर कोच म्हणून नेमल्यानंतर मरेचे विंबल्डन जेतेपदाचे स्वप्न साकार
     

यापूर्वीचे नंबर वन टेनिसपटू 
(कालावधीनुसार उतरत्या क्रमाने) - नोव्हाक जोकोविच, रॅफेल नदाल, रॉजर फेडरर, अँडी रॉडीक, जुआन कार्लोस फेरेरो, लेटन ह्युईट, गस्ताव कर्टन, मॅराट साफीन, पॅट्रिक राफ्टर, येवगेनी कॅफेल्निकोव, कार्लोस मोया, मार्सेलो रिऑस, थॉमस मस्टर, आंद्रे अगासी, पीट सॅंप्रास, जिम कुरियर, बोरिस बेकर, स्टीफन एडबर्ग, मॅट्‌स विलॅंडर, इव्हान लेंडल, जॉन मॅकेन्रो, बियाँ बोर्ग, जिमी कॉनर्स, जॉन न्यूकोम्ब, इली नस्तासे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com