अग्रमानांकित केर्बरचा व्हेस्नीनाकडून पराभव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

इंडियन वेल्स, कॅलिफोर्निया - अग्रमानांकित जर्मनीच्या अँजेलिक केर्बरला इंडियन वेल्स डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. रशियाच्या एलेना व्हेस्नीना हिने तिला 6-3, 6-3 असे दोन सेटमध्येच हरविले.

व्हेस्नीनाला 14वे मानांकन आहे. व्हेस्नीनाने 28 "वीनर्स' मारले. तिने केर्बरची सर्व्हिस पाच वेळा भेदली. केर्बरला व्हेस्नीनाच्या खेळाचा अंदाज असा आलाच नाही. या स्पर्धेतून सेरेना विल्यम्सने माघार घेतली. त्यामुळे केर्बर पुढील आठवड्यात जागतिक क्रमवारीत अव्वल बनेल. व्हेस्नीनाने कारकिर्दीत "टॉप थ्री'मधील प्रतिस्पर्ध्याला प्रथमच हरविले. उपांत्यपूर्व फेरीत तिची व्हीनस विल्यम्सविरुद्ध लढत होईल. व्हिनसने चीनच्या शुआई पेंगचे आव्हान 3-6, 6-1, 6-3 असे परतावून लावले. व्हीनस आणि व्हेस्नीना यांच्यात पाच लढती झाल्या आहेत. त्यात व्हेस्नीनाने तीन विजय मिळविले आहेत. मागील लढतीत मायामी ओपनमध्ये व्हेस्नीनाची सरशी झाली होती.

Web Title: indian wells wta tennis competition