माझा द्वेष करणाऱ्यांकडूनच अपप्रचार - पेस

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली - ‘काही स्पर्धक माझा कमालीचा द्वेष करतात. यामुळेच ते अपप्रचार करतात, पण मी त्यांची फिकीर करीत नाही. मी इतिहास घडविण्यात व्यग्र आहे आणि तो कुणीही बदलू शकणार नाही,’ असा प्रतिटोला टेनिसपटू लिअँडर पेस याने लगावला आहे.

 

नवी दिल्ली - ‘काही स्पर्धक माझा कमालीचा द्वेष करतात. यामुळेच ते अपप्रचार करतात, पण मी त्यांची फिकीर करीत नाही. मी इतिहास घडविण्यात व्यग्र आहे आणि तो कुणीही बदलू शकणार नाही,’ असा प्रतिटोला टेनिसपटू लिअँडर पेस याने लगावला आहे.

 

ऑलिंपिक, आशियाई क्रीडा स्पर्धा किंवा डेव्हिस करंडक लढतीच्या वेळी नेहमी वाद निर्माण होतात, पण अपप्रचारच त्यास कारणीभूत असल्याचा दावा त्याने केला. तो म्हणाला की, ‘या मंडळींना माझी प्रतिमा मलिन करायची आहे. त्यासाठीच ते छुप्या कारवाया करीत राहतात. त्यामुळे लिअँडर हा ‘वाईट मनुष्य’ आहे असा समज लोकांमध्ये निर्माण होतो. प्रतिमा, लौकिक निर्माण करायला सारे आयुष्य खर्ची घालावे लागते आणि ते उद्‌ध्वस्त करायला एक सेकंद पुरतो.’

अशा नकारात्मकतेचा कंटाळा आला आहे का, या प्रश्‍नांवर पेसने सांगितले की, ‘शेवटी मी एक मनुष्य आहे, पण आता मी त्याकडे लक्ष देत नाही. जे लोक खरे वागतात आणि प्रामाणिक आहेत ते माझ्याशी चांगले किंवा वाईट वागले तरी मी त्यांचा आदर करतो.’ आपल्यावर भूंकणाऱ्या अशा मंडळींची फिकीर करीत नसल्याची तीव्र प्रतिक्रियाही पेसने व्यक्त केली.

क्रीडा

मुंबई - ईशा करवडेच्या प्रभावी विजयामुळे भारतीय महिलांनी जागतिक सांघिक बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत व्हिएतनामचा पराभव केला;...

09.51 AM

मुंबई - देशातील कबड्डीत घराणेशाही असल्याचा आरोप करत भारतात नव्या राष्ट्रीय कबड्डी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या ‘न्यू...

09.51 AM

मुंबई/लंडन - पाकिस्तानला हरवणेच पुरेसे नाही, हे भारतीय हॉकीपटूंना समजण्याची गरज आहे. भारतीय जिंकण्यासाठी उत्सुकच नव्हते, अशा...

09.51 AM