डेव्हिस कंरडकासाठी महेश भूपती कर्णधार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : स्टार टेनिसपटू महेश भूपती याची डेव्हिस कंरडक टेनिस स्पर्धेसाठी भारताचा न खेळणारा कर्णधार म्हणून गुरुवारी निवड करण्यात आली. मात्र, तो ही जबाबदारी पुढील वर्षी 3 ते 5 फेब्रुवारीदरम्यान, पुणे येथे होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीनंतरच स्वीकारणार आहे.

नवी दिल्ली : स्टार टेनिसपटू महेश भूपती याची डेव्हिस कंरडक टेनिस स्पर्धेसाठी भारताचा न खेळणारा कर्णधार म्हणून गुरुवारी निवड करण्यात आली. मात्र, तो ही जबाबदारी पुढील वर्षी 3 ते 5 फेब्रुवारीदरम्यान, पुणे येथे होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीनंतरच स्वीकारणार आहे.

आशिया ओशियाना गट एकमधील या लढतीसाठी आनंद अमृतराजच भारताचे कर्णधार राहणार आहेत. अमृतराज यांच्यानंतर कर्णधारपदाच्या शर्यतीत भूपतीचेच नाव स्पर्धेत होते. भारतीय टेनिस संघटनेचे सचिव हिरोन्मय चॅटर्जी म्हणाले,""कर्णधार म्हणून कुणीच स्वतःला गृहित धरू नये. प्रत्येकाला कर्णधारपदाची जबाबदारी मिळेल. महेशला ही जबाबदारी सोपविताना मी स्वतः त्याच्याशी चर्चा केली. त्याने उपलब्धता कळविल्यानंतरच त्याच्या नावाला पसंती दिली. त्याचबरोबर अमृतराज यांना निरोपासाठी एक स्पर्धा घ्यायलाच हवी असे वाटल्याने आम्ही त्यांना न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत कर्णधार कायम ठेवले.''

या निर्णयानंतर अमृतराज समाधानी आहेत का आणि खेळाडूंचा सल्ला घेतलात का? अशा दुहेरी प्रश्‍नांना चॅटर्जी यांनी नकारात्मकच उत्तर दिले. ते म्हणाले,""कुणालाच कर्णधारपदावरून दूर जायचे नसते. पण, प्रत्येक जण कर्णधारपदासाठी लायक असतो. त्याचबरोबर कुठलाही निर्णय घेताना खेळाडूंशी चर्चा करण्याची आम्हाला गरज वाटत नाही. अगदी पेसबरोबर देखील आम्ही चर्चा केली नाही.''

आनंद अमृतराज यांनी खेळाडू आणि त्यांच्या तयारीविषयी केलेल्या वक्तव्यानंतर संघटनेने सखोल चर्चा करूनच निर्णय घेतला. त्याचबरोबर खेळाडूंकडूनही अमृतराज यांना पाठिंबा देणारे पत्र आले नाही. सोमदेव देववमर्ओन आणि रमेश कृष्णन यांच्याशी कर्णधार आणि प्रशिक्षकाच्या भूमिकेसाठी कसलीही चर्चा झाली नसल्याचेही चॅटर्जी यांनी स्पष्ट केले.

कर्णदारपदाची जबाबदारी स्वीकारताना भूपतीने विशेष अशी काहीच मागणी केली नाही. त्यांनी फक्त "हो' इतकेच म्हटले. त्याला नियमाप्रमाणे मानधन दिले जाईल.
- हिरोन्मय चॅटर्जी, भारतीय टेनिस संघटनेचे सचिव