डेव्हिस करंडकात भारताविरुद्ध खेळणार रॅफेल नदाल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली - भारताविरुद्ध डेव्हिस करंडक पुरुष सांघिक टेनिस स्पर्धेतील जागतिक गटाच्या पात्रता लढतीसाठी स्पेनने पूर्ण ताकदीचा संघ निवडला असून, मातब्बर रॅफेल नदाल याची निवड केली आहे. १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान ही लढत दिल्लीत होईल.

जागतिक क्रमवारीत तो पाचव्या स्थानावर आहे. अमेरिकन ओपनमध्ये त्याला चौथ्या फेरीत पराभूत व्हावे लागले होते. नदालच्या जोडीला १३व्या क्रमांकावरील डेव्हिड फेरर, १८व्या क्रमांकावरील फेलिसियानो लोपेझ आणि दुहेरीच्या क्रमवारीत १९वा असलेला मार्क लोपेझ असे खेळाडू स्पेन संघात आहेत. भारतीय खेळाडूंमध्ये साकेत मायनेनी याचा १४३वा क्रमांक सर्वोत्तम आहे. रामकुमार रामनाथन २०२व्या स्थानावर आहे. दुहेरीत १७वा रोहन बोपण्णा आणि ६२वा लिअँडर पेस यांचे स्थान कायम आहे.