सलग दुसऱ्या स्पर्धेत सानिया अंतिम फेरीत 

पीटीआय
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

सिडनी - भारताची दुहेरीतील अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने मोसमातील सलग दुसऱ्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. सिडनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने चेक प्रजासत्ताकाच्या बार्बरा स्ट्रीकोवा हिच्या साथीत ही कामगिरी केली.

सिडनी - भारताची दुहेरीतील अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने मोसमातील सलग दुसऱ्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. सिडनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने चेक प्रजासत्ताकाच्या बार्बरा स्ट्रीकोवा हिच्या साथीत ही कामगिरी केली.

अग्रमानांकन असलेल्या या जोडीने वानिया किंग (अमेरिका)-यारोस्लावा श्‍वेडोवा (कझाकस्तान) यांच्यावर 6-1, 6-2 अशी मात केली. त्यांनी 51 मिनिटांतच हा सामना जिंकला. सानिया-बार्बराने पाचही ब्रेकपॉइंट वाचविले. त्यांनी दोन्ही सेटमध्ये प्रत्येकी दोन वेळा प्रतिस्पर्धी जोडीची सर्व्हिस भेदली. आता त्यांच्यासमोर टिमीया बॅबोस (हंगेरी)-अनास्ताशिया पावल्यूचेन्कोवा (रशिया) यांचे आव्हान असेल. या जोडीला मानांकन नाही. त्यांनी अँड्रिया क्‍लेपॅक (स्लोव्हेनिया)-मारिया होजे मार्टिनेझ सॅंचेझ (स्पेन) यांना 6-3, 6-4 असे हरविले. गेल्या आठवड्यात सानियाने अमेरिकेच्या बेथानी मॅट्टेक-सॅंड्‌स हिच्या साथीत ब्रिस्बेनमधील स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. तिला अव्वल स्थान मात्र गमवावे लागले होते. बेथानीने पाच क्रमांक झेप घेत सानियाला मागे टाकले होते.

क्रीडा

कोलंबो - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे प्रेमसंबंध सर्वांनाच माहिती असताना आता या दोघांच्या प्रेमाचे...

01.09 PM

मॅसन ओहायो - ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओस याने आपली घोडदौड कायम राखत सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक...

10.12 AM

मुंबई - भारतीय कुस्ती संघाला सोमवारी सुरू होणाऱ्या जागतिक स्पर्धेत चार ते पाच पदकांची आशा आहे. ही पदके प्रामुख्याने फ्रीस्टाईल...

10.12 AM