संपूर्ण मोसमातून जोकोविचची माघार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

बेलग्रेड - सर्बियाचा १२ ग्रॅंड स्लॅम विजेता टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने बुधवारी कोपराच्या दुखापतीमुळे उर्वरित पूर्ण मोसमातून माघार घेत असल्याचे जाहीर केले.

विंबल्डन उपांत्यपूर्व फेरीत याच दुखापतीमुळे जोकोविचला टोमास बर्डिचविरुद्ध माघार घ्यावी लागली होती. त्याच वेळी त्याने प्रदीर्घ विश्रांतीचे संकेत दिले होते. जोकोविचने आज आपल्या फेसबुक पेजवरून ही घोषणा केली. तो म्हणाला, ‘‘गेली दीड वर्षे मी दुखापतीचा सामना करत आलो आहे. आता आणखी धोका पत्करण्याची माझी तयारी नाही. त्यामुळे यावर्षी टेनिसच्या उर्वरित मोसमात आपण कुठलीही स्पर्धा खेळणार नाही.’’

गेल्या वर्षी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा जिंकून त्याने ‘करियर स्लॅम’ पूर्ण केला होता. पण त्यानंतर तो एकही मोठी स्पर्धा जिंकू शकला नाही. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत त्याला दुसऱ्या फेरीत पराभूत व्हावे लागले. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत त्याला उपांत्यपूर्व फेरीतच बाहेर पडावे लागले होते.

क्रीडा

नागपूर - महाराष्ट्राची सुवर्णकन्या संजीवनी जाधव हिला आशियाई इनडोअर क्रीडा स्पर्धेत तीन हजार मीटर शर्यतीत रौप्यपदकावर समाधान...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मुंबई - पी. व्ही. सिंधू आणि नोझोमी ओकुहारा यांच्यात जागतिक स्पर्धा; तसेच कोरिया ओपन सुपर सीरिज स्पर्धेत मॅरेथॉन अंतिम लढत झाली...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

यंदाचे वर्ष टेनिसपटू रॅफेल नदालसाठी एक यशस्वी वर्ष ठरत आहे. जागतिक क्रमवारीत तो पुन्हा अव्वल स्थानावर आला. ऑस्ट्रेलियन ओपनच्या...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017