मनगटाच्या दुखापतीमुळे जोकोविच अमेरिकन ओपन स्पर्धेलाही मुकणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

बेलग्रेड (सर्बिया) - सर्बियाचा माजी अव्वल मानांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोविचला मनगटाच्या दुखापतीमुळे अमेरिकन ओपन स्पर्धेलाही मुकावे लागणार आहे. जोकोविचला याच कारणामुळे विंबल्डन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतून माघार घ्यावी लागली होती. त्याचवेळी त्याने दुखापतीमधून बरे होण्यासाठी विश्रांती घेण्याचा विचार करत असल्याचे संकेत दिले होते.

सर्बियातील प्रसार माध्यमांनी ३० वर्षीय जोकोविचला किमान १२ आठवड्यांची विश्रांती घ्यावी लागेल असे वृत्त दिले आहे. सतत खेळण्यामुळे त्याच्या मनगटातील हाडांना दुखापत झाल्याचे या वृत्तात म्हटले आहे. दुखापतीसंदर्भात आणखी काही चाचण्या करून घेण्यासाठी जोकोविच सध्या टोरॅंटो येथे गेला आहे.

टॅग्स