ग्रिगॉर दििमत्रोवचा मोठा विजय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

सिनसिनाटी स्पर्धेत अंतिम लढतीत किर्गीओसवर मात

मॅसन ओहयो - बल्गेरियाच्या सातव्या मानांकित ग्रिगॉर दिमित्रोव याने कारकिर्दीमधील सर्वात मोठा विजय नोंदवताना सिनसिनाटी टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळविले. अंतिम लढतीत त्याने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गीओस याचे आव्हान ६-३, ७-५ असे संपुष्टात आणले.

जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानावर असणाऱ्या दिमित्रोवने कारकिर्दीमध्ये प्रथमच मास्टर्स टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले. कारकिर्दीमधील त्याचे हे एकूण सातवे विजेतेपद ठरले. दोन्ही सेटमध्ये एकेकदा किर्गीओसची सर्व्हिस भेदण्यात दिमित्रोवला यश आले. संयम आणि अचूकता हेच त्याच्या खेळाचे वैशिष्ट्य होते. त्याउलट नदालला पराभूत करताना दाखवलेला खेळ किर्गिओसला अंतिम लढतीत दाखवता आला नाही. दुसऱ्या सेटमध्ये सातव्या गेमला त्याने दोन ब्रेक पॉइंट वाचवले हीच काय ती समाधानाची बाब ठरली. अकराव्या गेमला दिमित्रोवने त्याची सर्व्हिस भेदण्याची संधी गमावली नाही आणि नंतर बाराव्या गेमला सर्व्हिस राखून त्याने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. 

मुगुरुझा सरस
महिला एकेरीत विंबल्डन विजेती स्पेनची गार्बिन मुगुरुझा सरस ठरली. स्पेनच्या चौथ्या मानांकित मुगुरुझा हिने रुमानियाच्या सिमोना हालेप हिचे आव्हान ६-१, ६-० असे अगदीच किरकोळीत परतवून लावले. मुगुरुझाने तासाभरापेक्षा कमी वेळात  विजय मिळविला. तिने आपल्या बहारदार खेळाने हालेपला जराशीही संधी दिली नाही. या पराभवाने हालेपने कॅरोलिना प्लिस्कोवा हिला मागे टाकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविण्याची संधी गमावली.