एक टर्म आधी पूर्ण करीत अर्जुनचे व्यावसायिक पदार्पण

रविवार, 3 सप्टेंबर 2017

पुणे - पुण्याचा टेनिसपटू अर्जुन कढे याने अमेरिकेतील विद्यापीठ शिक्षण अर्धे सेमिस्टर आधी पूर्ण करीत व्यावसायिक टेनिसमध्ये पदार्पण केले आहे. चेन्नईतील आयटीएफ स्पर्धेत त्याने पात्रता फेरीचा पहिला सामना जिंकला.

पुणे - पुण्याचा टेनिसपटू अर्जुन कढे याने अमेरिकेतील विद्यापीठ शिक्षण अर्धे सेमिस्टर आधी पूर्ण करीत व्यावसायिक टेनिसमध्ये पदार्पण केले आहे. चेन्नईतील आयटीएफ स्पर्धेत त्याने पात्रता फेरीचा पहिला सामना जिंकला.

वाइल्ड कार्ड मिळालेल्या अर्जुनने निक्षेप बल्लेकेरे रविकुमार याला ६-१, ६-० असे हरविले. अर्जुनने अमेरिकेतील ओक्‍लाहोमा विद्यापीठातून बिझनेस मॅनेजमेंट मार्केटिंग विषयात बॅचलर डिग्री संपादन केली. त्याचा कोर्स येत्या डिसेंबरमध्ये पूर्ण होणार होता; पण त्याने जुलैमध्ये तो पूर्ण केला. तो म्हणाला की, आम्हाला १२० ‘क्रेडिट अवर्स’ पूर्ण करावे लागतात. त्यासाठी सोमवार ते शुक्रवार क्‍लास आणि शनिवार-रविवार स्पर्धा असे वेळापत्रक सुरवातीपासून होते.’

२३ वर्षांच्या अर्जूनची ही दुसरीच स्पर्धा आहे. स्पेनमधील पहिल्या स्पर्धेत पात्रता फेरीत तीन सामने जिंकल्यानंतर तो मुख्य स्पर्धेत पहिल्या फेरीत हरला होता. अर्जुनला अद्याप गुण मिळालेला नाही. त्यामुळे गुणांचे खाते उघडण्याचे पहिले आव्हान आहे.

क्रीडा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनी याची '...

08.03 PM

लंडन : इंग्लंडकडून पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजचा पराभव झाल्यामुळे आता श्रीलंकेचा संघ 2019 मध्ये होणाऱ्या विश्‍...

02.09 PM

सुवर्ण लक्ष्य साधण्यासाठी आहारासह प्रशिक्षणाचा सर्व खर्च उचलणार पुणे - प्रतिकूल परिस्थितीला ‘पंच’ देऊन बॉक्‍सिंगमध्ये कारकीर्द...

09.15 AM