विंबल्डन : फेडरर, थिएम, मिलॉसची आगेकूच

पीटीआय
शनिवार, 8 जुलै 2017

लंडन : जपानच्या केई निशीकोरीला विंबल्डनच्या तिसऱ्याच फेरीत पराभूत व्हावे लागले. स्पेनच्या रॉबर्टो बॉटीस्टा आगुटने त्याच्यावर 6-4, 7-6 (7-3), 3-6, 6-3 अशी मात केली. 

निशीकोरीला नववे, तर आगुटला 18वे मानांकन आहे. निशोकोरीला अलीकडे दुखापतींनी त्रस्त केले आहे, पण हा निकाल त्याच्यासाठी निराशाजनक ठरला. 

दरम्यान, गुरुवारी तृतीय मानांकित स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर, डॉमनिक थिएम, मिलॉस राओनीच यांनी आगेकूच केली. फेडररने सर्बियाच्या ड्युसान लाजोविच याचे आव्हान 7-6 (7-0), 6-3, 6-2 असे परतावून लावले. 

फेडररने 79व्या स्थानावरील प्रतिस्पर्ध्याविरुद्ध पहिले सात गुण गमावले होते. तो 0-2 असा मागे पडला होता, पण त्याने लगेच ब्रेकची भरपाई केली. त्याने टायब्रेक एकतर्फी ठरविला. त्यानंतर त्याने पकड भक्कम केली. त्याने 99 मिनिटांत सामना जिंकताना नऊ एस आणि 30 विनर्स मारले. आता त्याच्यासमोर जर्मनीच्या मिशा झ्वेरेवचे आव्हान असेल. 

गतउपविजेत्या कॅनडाच्या मिलॉस राओनीचने रशियाच्या मिखाईल यूझ्नीचे आव्हान पहिल्या सेटच्या पिछाडीनंतर 3-6, 7-6 (9-7), 6-4, 7-5 असे परतावून लावत तिसरी फेरी गाठली. टायब्रेकमध्ये युझ्नीने 6-4 अशी आघाडी घेतली होती. त्याला दोन सेटपॉइंट मिळाले होते. त्या वेळी तो कमी पडला. 

आठव्या मानांकित ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिएमने फ्रान्सच्या गिल्लेस सायमनचे आव्हान 5-7, 6-4, 6-2, 6-4 असे परतावून लावले. त्याने येथे प्रथमच तिसरी फेरी गाठली. त्याने ताशी 135 मैल वेगाने बिनतोड सर्व्हिस करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. सायमन अनुभवी प्रतिस्पर्धी असल्यामुळे ही कामगिरी थिएमसाठी आश्वासक ठरेल. तो म्हणाला की, माझ्यासाठी ग्रास कोर्ट नैसर्गिक नाही, पण असे विजय बराच आत्मविश्वास देतात. 

थिएमने ग्रास कोर्टवरील कौशल्य नव्हे तर एकूणच खेळ उंचावण्यासाठी प्रयत्न केल्याचे जाणवले. त्याचे फुटवर्क चांगले होते. तो म्हणाला, की मी फटक्‍यांचे स्विंग आणि इतर प्रत्येक गोष्टी बदलू शकत नाही, पण मी स्पिनचे प्रमाण केले. मी जास्त पुढे येऊन खेळलो. मी व्हॉलींवरही मेहनत घेतली. 

तिसऱ्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवाला दुसऱ्याच फेरीत पराभूत व्हावे लागले. 108 व्या क्रमांकावरील मॅग्डलेना लिबॅरीकोवाने 3-6, 7-5, 6-2 असा अनपेक्षित निकाल नोंदविला. प्लिस्कोवाने गेल्या वर्षी अमेरिकन ओपनची अंतिम, तर गेल्या महिन्यात फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी गाठली होती. विंबल्डनमध्ये मात्र तिला अपयशी मालिका खंडित करता आली नाही. तिला सलग सहाव्या वर्षी दुसऱ्या फेरीच्या पुढे वाटचाल करता आली नाही. 

डेन्मार्कच्या कॅरोलिन वॉझ्नीयाकीने दुसऱ्या फेरीत बल्गेरियाच्या स्वेताना पिरोंकोवाला 6-3, 6-4 असे हरविले. प्रामुख्याने बेसलाइनवरून खेळ झालेल्या लढतीत वॉझ्नीयाकीने दोन्ही बाजूंना मारलेले ताकदवान फटके निर्णायक ठरले. स्वेताना 131व्या स्थानावर आहे. याआधी वॉझ्नीयाकीविरुद्ध तिने चारही सामने गमावले होते.