विंबल्डन : मातब्बर फेडररसमोर चिलीचचे आव्हान 

पीटीआय
रविवार, 16 जुलै 2017

लंडन : 'हॉट फेव्हरीट' रॉजर फेडरर विंबल्डनमध्ये इतिहास घडविण्यासाठी सज्ज झाला आहे. क्रोएशियाच्या मरिन चिलीच याच्या रूपाने त्याच्यासमोर आव्हान आहे. रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात फेडररचे पारडे जड असेल, पण चिलीचसुद्धा त्याला झुंजविण्याच्या निर्धाराने कोर्टवर उतरेल. 

रॅफेल नदाल, अँडी मरे आणि नोव्हाक जोकोविच यांच्या अनपेक्षित पराभवानंतर फेडररने आपले आव्हान कायम राखत चाहत्यांना जल्लोषाची पर्वणी दिली आहे. यंदा मोसमाच्या प्रारंभी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून धडाक्‍यात पुनरागमन केल्यानंतर तो आणखी एक ग्रॅंड स्लॅम करंडक उंचावण्याची अपेक्षा आहे. 

फलदायी ब्रेक 
फेडररला गेल्या वर्षी उपांत्य फेरीत कॅनडाच्या मिलॉस राओनिचने हरविले. त्या निराशाजनक पराभवानंतर फेडररने 'ब्रेक' घेतला. त्याने मोसमाच्या वेळापत्रकाचे फेरनियोजन केले. त्यामुळे त्याला यंदा सुसज्ज होता आले. ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून त्याने जगभरातील चाहत्यांना पर्वणी दिली. त्यानंतर त्याने पुन्हा ब्रेक घेताना फ्रेंच ओपनसह क्‍ले कोर्ट स्पर्धांवर काट मारली. 

मागील वर्षाचा संदर्भ 
गेल्या वर्षी उपांत्यपूर्व फेरीत फेडरर आणि चिलीच आमनेसामने आले होते. त्या वेळी चिलीचने दोन सेटची आघाडी घेतली होती, पण फेडररने तीन मॅचपॉइंट वाचवीत बाजी मारली. 

दृष्टिक्षेपात 

  • ब्रिटनचे विल्यम ऊर्फ विली रेनशॉ आणि अमेरिकेचा पीट सॅंप्रास यांच्यासह फेडररच्या नावावर पुरुष एकेरीत सर्वाधिक सात विजेतेपदांचा संयुक्त विक्रम 
  • गेल्या 15 विंबल्डन स्पर्धांत फेडरर 11व्या वेळी अंतिम फेरीत. गेल्या दोन अंतिम सामन्यांत त्याचा पराभव 
  • फेडररला एकही सेट न गमावता विंबल्डन जिंकण्याची संधी. यापूर्वी अशी कामगिरी बियॉं बोर्ग यांनी 1976 मध्ये नोंदविली होती. 
  • फेडररने 2007च्या ऑस्ट्रेलियन स्पर्धेत एकही सेट न गमावता जेतेपद पटकावले होते. 
  • एकापेक्षा जास्त ग्रॅंड स्लॅम करंडक जिंकणारा क्रोएशियाचा पहिलाच टेनिसपटू बनण्याची चिलीचला संधी. 
  • गोरान इव्हानसेविच याने 2001 मध्ये विंबल्डन विजेतेपद मिळविले होते.  

आमने सामने 

  • फेडरर आणि चिलीच सात वेळा आमनेसामने 
  • सहा सामन्यांत फेडररची सरशी 
  • ग्रास कोर्टवरील एकमेव लढत गेल्या वर्षी येथेच उपांत्यपूर्व फेरीत