नदीतील तराफ्यावर टेनिस सामना!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

झ्युरिक - येथील लिमॅट नदीपाशी रविवारी नेहमीपेक्षा जास्त गर्दी दिसत होती. ही मंडळी फेरफटका न मारता एका जागी थांबून एका दिशेने पाहात होती. तराफ्यावर उभारण्यात आलेल्या खास कोर्टवर दोन टेनिसपटू रॅली करीत होते. ते साधेसुधे नव्हते तर मातब्बर होते.

हे वर्णन आहे रॉजर फेडरर आणि अँडी मरे यांच्यातील प्रदर्शनी लढतीचे. रॉजर फेडरर फाउंडेशनने हा उपक्रम आयोजित केला होता. आफ्रिका तसेच स्वित्झर्लंडमधील गरीब मुलांना शिक्षण घेता यावे, म्हणून निधी उभारण्याकरिता याचे आयोजन झाले.

मरे कोपराच्या दुखापतीमधून तंदुरुस्त झाला आहे. ही नदी झ्युरिक शहराच्या दक्षिणेतून वाहते. या उपक्रमासाठी मरे आपल्या विमानातून दाखल झाला. यास चालना मिळावी म्हणून फेडररने काही देशांना भेटही दिली आहे. दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट एलिझाबेथमधील एन्डझॉंडेलेलो हायस्कूलला यातून निधी देण्यात आला. तीन ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना याचा फायदा होतो. स्वित्झर्लंडमधील मुलांना मनोरंजनात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित केले जाते. या फाउंडेशनचे काम व्यावसायिक पद्धतीने चालविले जाते.

Web Title: tennis match on river raft