अजय जयराम उपांत्यपूर्व फेरीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

कुचिंग (मलेशिया) - मुंबईच्या अजय जयराम याने उपांत्यपूर्व फेरी गाठताना मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान कायम राखले आहे. जयरामने जागतिक क्रमवारीतील पाचव्या मानांकित आणि गेल्याच आठवड्यात इंडियन ओपन स्पर्धेतील विजेत्या व्हिक्‍टर ऍक्‍सेलसेन याचे आव्हान संघर्षपूर्ण लढतीत 9-21, 21-14, 21-19 असे संपुष्टात आणले.

जागतिक क्रमवारीत 19व्या स्थानावर असणाऱ्या जयरामने पहिल्या फेरीत चीनच्या क्विाआओ बीन याचा पराभव केला होता. दुसऱ्या फेरीत त्याला ऍक्‍सेलसेनचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला. डेन्मार्कच्या ऍक्‍सेलसेन याने पहिला गेम सहज जिंकत धडाक्‍यात सुरवात केली होती. जयरामने खेळात सुधारणा करत दुसरा गेम जिंकून बरोबरी साधली. निर्णायक सेटमध्ये अधिक सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन दोघांकडूनही झाले. अखेरच्या काही क्षणांपर्यंत गेम बरोबरीतच होती. जयरामने त्यावेळी सलग दोन गुण जिंकत विजयावर शिक्कामोर्तब केले. मलेशियन ओपन स्पर्धेत साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांच्यासह दुहेरीतील जोड्यांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आल्याने आता भारताच्या सगळ्या आशा जयराम याच्यावरच केंद्रित आहेत.

Web Title: ajay jairam in quarter-final