सचिन म्हणाला, माझी जागा तुला घ्यायची आहे- रहाणे

सचिन निकम
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

स्वप्न बघा, स्वप्नांचा पाठलाग करा. स्पीड ब्रेकर्स येतील, पण ते पार करा. तुम्हाला हवं ते नक्कीच मिळेल... : अजिंक्य रहाणे

पुणे- मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोबत शेवटच्या कसोटी सामन्यात खेळलो. यावेळी त्याने मला माझा खेळ असाच ठेवण्याचा सल्ला देण्याबरोबरच माझी जागा तुला घायची असल्याचे सांगितले, असे गुपीत भारतीय कसोटी क्रिकेट संघातील खेळाडू अजिंक्य रहाणे याने आज (शनिवार) उलगडले.

मनातील स्वप्नांचा पाठलाग कसा करावा, सुनियोजित कष्ट म्हणजे नेमके काय, यश-अपयशात अडकून न राहता पुढील प्रवासावर लक्ष केंद्रित कसे करावे, यावर क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी अजिंक्‍य रहाणेसोबत गप्पा मारून त्याच्या यशाचे रहस्य उलगडले. यावेळी बोलताना अजिंक्य म्हणाला, 'संघासाठी सर्वोत्तम देण्याचा नेहमी प्रयत्न करतो. मैदानात उतरण्यापूर्वी मानसिक सक्षम असणे गरजेचे आहे. मला स्लेजिंग करायला आवडत नसून, फलंदाजीने उत्तर देतो. संघामध्ये जो चांगला खेळतो त्याला सगळ्यांच्या पाठिंबा असतो. परंतु, एखाद्याचा खेळ चांगला होत नसेल तर त्याला पाठिंबाही दिला पाहिजे. तंदरुस्तीची खूप गरज असल्याने व्यायामा बरोबर खेळाडूंनी खाण्याकडेही लक्ष दिले पाहिजे. याबरोबरच शिक्षण आपल्या आयुष्यात महत्वाचे आहे. लहान गावातून खेळाडू येत असल्याने खेळासाठी ही चांगली गोष्ट आहे.'

सचिन तेंडुलकर व राहुल द्रविड हे रोल मॉडेल आहेत. सचिनने मला जो सल्ला दिलो तो आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. द्रविडने मला संघाची जबाबदारी घ्यायला शिकवले. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा खेळ पाहून मजा येते. विराटची नेहमी नवनवीन शिकण्याच्या वृत्ती आहे. संघातील प्रत्येक खेळाडू माझा चांगला मित्र आहे. प्रत्येकाने स्वप्न पहावे, स्वप्नांचा पाठलाग करावा, स्पीड ब्रेकर्स येतील, पण ते पार करा. तुम्हाला हवं ते नक्कीच मिळेल व तुम्ही पुढे जाल, असेही अजिंक्य म्हणाला.

या वेळी सकाळ प्रकाशनाच्या "कांगारू' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि पर्यटनाचा जिवंत अनुभव देणारे हे पुस्तक सुनंदन लेले यांनी लिहिले आहे.

क्रीडा

लंडन - इंग्लंडमधील ट्‌वेंटी ट्‌वेंटी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

मुंबई - पी. व्ही. सिंधू तसेच बी. साईप्रणीत आणि अजय जयराम यांनी भारतीय बॅडमिंटनची ताकद दाखवत जागतिक स्पर्धेतील आपली मोहीम सुरू...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली - निवड समितीने सादर केलेल्या शिफारसीनुसार केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी पॅरालिंपियन देवेंद्र झाझरिया आणि माजी...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017