आंतरराष्ट्रीय सुपरक्रॉससाठी अमेरिकन रायडर सज्ज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

पुणे -  येत्या शनिवारी होणाऱ्या एमआरएफ मोग्रीप आंतरराष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धेसाठी अमेरिकेच्या पाच तरुण रायडरचा एक गट पुण्यात दाखल झाला आहे. मुंढवा येथील पासपोर्ट कार्यालयाशेजारील मैदानावर ही स्पर्धा प्रकाशझोतात पार पडेल.

पुणे -  येत्या शनिवारी होणाऱ्या एमआरएफ मोग्रीप आंतरराष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धेसाठी अमेरिकेच्या पाच तरुण रायडरचा एक गट पुण्यात दाखल झाला आहे. मुंढवा येथील पासपोर्ट कार्यालयाशेजारील मैदानावर ही स्पर्धा प्रकाशझोतात पार पडेल.

माजी आंतरराष्ट्रीय रायडर श्‍याम कोठारी यांच्या गॉडस्पीड संस्थेने आयोजित केलेली ही मालिका आहे. हे रायडर स्वतःच्या बाईक घेऊन आलेले नाहीत. संयोजक त्यांना ऐनवेळी बाईक देतील. जॅरेड हिक्‍स हा अलाबामाचा रहिवासी असून त्याने सांगितले की, ‘नाताळनंतर सुरू होणाऱ्या मोसमासाठी या सुपरक्रॉसने सुरवात करता येईल. त्यामुळे सराव होईल. गेल्या वर्षी मी चौथा आलो. त्यामुळे यंदा ‘पोडियम फिनिश’चे ध्येय ठेवले आहे.’
डिस्टीन फॅरेसने सांगितले की, मेक्‍सिको वगळता परदेशात मी प्रथमच आलो आहे. त्यामुळे उत्सुक आहे.’ त्याने मोटो जीपी रुकी करंडक स्पर्धेत पहिल्या तीन जणांत स्थान मिळविले.
ट्रेव्हर डन हा १८ वर्षांचा असला तरी तो सहा वर्षांचा असल्यापासून रायडिंग करतो आहे. त्यामुळे त्याला १२ वर्षांचा अनुभव आहे. प्रो लायसन्स मिळविण्याचे त्याचे ध्येय आहे.
काईल मॅक्‌एलरॅथने अमेरिकेतील ईस्ट कोस्टमध्ये अनेक ठिकाणी भाग घेतला आहे. भारतातील सुपरक्रॉस सर्वस्वी वेगळा अनुभव असेल, असे त्याने नमूद केले.

सहभागी स्पर्धक ः ब्राईस स्टुअर्ट ः मेटलाईफ सुपरक्रॉस १५०, ग्लेनडेल ४५० ॲमा सुपरक्रॉस मुख्य स्पर्धा. डिस्टीन फॅरेस ः जेम्स स्टुअर्ट स्प्रिंग स्पर्धा वर्थहॅम, टेक्‍सास २५० प्रो-ॲम. जॅरेड हिक्‍स ः मॉन्स्टर एनर्जी एएमए सुपरक्रॉस, टीएमडब्ल्यूएक्‍स वेस्ट कोस्ट ओपन. काईल मॅक्‌एलरॅथ ः रॉकी माऊंटन राष्ट्रीय सुपरक्रॉस, एएमए विभागीय स्पर्धा ४५० क्‍लास. शॉन यारब्रोग ः सॅन दिएगो टू एसएक्‍स, अमेरिकन एसएक्‍स. ट्रेव्हर डन ः लॉरेट्टास, मिनी ऑलिंपिक्‍स, मिलक्रीक स्प्रिंग क्‍लासिक

Web Title: American Ryder, ready for inter national Supercross