ऑलिंपिक पदकासाठी अंजू जॉर्जचा लढा

पीटीआय
बुधवार, 29 मार्च 2017

मुंबई/कोची - अंजू बॉबी जॉर्ज अथेन्स ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील लांबउडीत पाचवी आली होती; पण आता तिला या स्पर्धेचे रौप्यपदक मिळण्याची शक्‍यता आहे. अथेन्सच्या तीनही पदक विजेत्या उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्या आहेत. त्यामुळे या पदकावर आपला हक्क असल्याचे अंजूसह तिघी खेळाडू सांगत आहेत. या पदकासाठीची त्यांची दीर्घकालीन लढाई आता सुरू झाली आहे. अथेन्स स्पर्धेतील तात्याना लेबेदेवा, इरिना मेलेशिना आणि तात्याना कोतोवा या ऑलिंपिक स्पर्धेनंतर उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्या आहेत. या स्पर्धेच्या वेळीही त्यांनी उत्तेजक घेतले होते, असा दावा अंजू करीत आहे.

मुंबई/कोची - अंजू बॉबी जॉर्ज अथेन्स ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील लांबउडीत पाचवी आली होती; पण आता तिला या स्पर्धेचे रौप्यपदक मिळण्याची शक्‍यता आहे. अथेन्सच्या तीनही पदक विजेत्या उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्या आहेत. त्यामुळे या पदकावर आपला हक्क असल्याचे अंजूसह तिघी खेळाडू सांगत आहेत. या पदकासाठीची त्यांची दीर्घकालीन लढाई आता सुरू झाली आहे. अथेन्स स्पर्धेतील तात्याना लेबेदेवा, इरिना मेलेशिना आणि तात्याना कोतोवा या ऑलिंपिक स्पर्धेनंतर उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्या आहेत. या स्पर्धेच्या वेळीही त्यांनी उत्तेजक घेतले होते, असा दावा अंजू करीत आहे. तिला या स्पर्धेत चौथी आलेली ऑस्ट्रेलियाची ब्राऊनविन थॉम्पसन तसेच सहावी आलेली ब्रिटनची जेड जॉन्सन यांचा पाठिंबा लाभला आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आता एकत्रितपणे पदकासाठीची लढाई सुरू करणार आहेत.

ऑलिंपिक स्पर्धेच्या वेळी पदकविजेत्या उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्या नव्हत्या; तसेच उत्तेजकांचे नमुने दहा वर्षेच ठेवले जातात. त्यामुळे तो पुरावाही नाही; पण लेबेदेवाचे २००८ चे सुवर्णपदक नुकतेच काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे २००४ च्या स्पर्धेतील पदकासाठी एकत्रित लढाई आता सुरू होणार आहे. 

प्रथमच तीन देश एकत्रितपणे लढणार आहेत. आता फेरतपासणीसाठी नमुने नसतील; पण याबाबतची दडवलेली माहिती देण्यासाठी नक्कीच अनेक जण पुढे येतील. आम्हाला भारत सरकारने पाठिंबा दिला आहे. भारतीय ॲथलेटिक्‍स महासंघासही सूचना दिल्या आहेत, असे अंजूने सांगितले. 

जागतिक ॲथलेटिक्‍स महासंघाच्या बैठकीत प्रथम आमच्या दाव्याबाबत निर्णय होईल. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचाही अंतिम निर्णय प्रक्रियेत सहभाग असेल. न्याय मिळाला नाही, तर क्रीडा लवादाकडेही जाण्याची आमची तयारी आहे. या सर्व प्रक्रियेस एक वर्षही लागू शकेल; पण आम्ही लढा सुरू ठेवणार आहोत, असेही अंजूने सांगितले.