आयटीएफ टेनिस स्पर्धेत अंकिता उपांत्यपूर्व फेरीत

पीटीआय
शुक्रवार, 26 मे 2017

लुआन (चीन) - भारताच्या अंकिता रैनाने आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिने दुसऱ्या फेरीत चीनच्या जिंग-जिंग ल्यू हिचे आव्हान ६-२, ५-७, ६-३ असे परतावून लावले. जागतिक क्रमवारीत अंकिताचा ३२१वा, तर ल्यू हिचा २९७वा क्रमांक आहे. ल्यू हिला सहावे मानांकन होते. 

अंकिताने यंदाच्या मोसमात प्रथमच पहिल्या तीनशे जणींमधील प्रतिस्पर्ध्याला हरविले. दोन तासांहून जास्त वेळ चाललेल्या लढतीत तिची तंदुरुस्ती महत्त्वाची ठरली. आता तिच्यासमोर तृतीय मानांकित चीनच्या फॅंगझोऊ लियू हिचे आव्हान असेल. लियू १३९व्या स्थानावर असल्यामुळे अंकिताचा कस लागेल.