अंशूची आठवड्यात दोनदा एव्हरेस्टवर चढाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

काठमांडू - भारताच्या महिला गिर्यारोहक अंशू जामसेन्पा यांनी एका आठवड्यात दोनदा अत्युच्य एव्हरेस्ट शिखर सर करण्याची कामगिरी केली. एकाच मोसमात दोनदा सर्वोच्च शिखर सर करण्याचा विक्रम त्यांनी नोंदविला.

अंशू यांनी वयाच्या ३७व्या वर्षी ही कामगिरी केली. सर्वोच्च ८, ८४८ मीटर (२९,०२८ फूट) उंचीच्या शिखरावरून अंशू १६ मे रोजीच परतल्या होत्या. त्यानंतर अल्पशा विश्रांतीनंतर त्यांनी रविवारी दुसऱ्यांदा ही मोहीम पूर्ण केली. 

अंशू यांनी आज सकाळी ८ वाजता एव्हरेस्टच्या शिखरावर पाऊल ठेवले. ड्रीम हिमालया ॲडव्हेंचर्स संस्थेने या कामगिरीला दुजोरा दिला असून, एकाच मोसमात दोनदा शिखर सर करण्याचा नवा विक्रम त्यांनी नोंदविला असल्याची माहिती त्यांनी दिली. दोन मुलांची आई असणाऱ्या अंशू यांनी चढाईपूर्वी तिबेट गुरू दलाई लामा यांचे आशीर्वाद घेतले होते.  नेपाळच्या चुरिम शेर्पा या एकाच मोसमात दोन वेळा एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला गिर्यारोहक ठरल्या होत्या. त्यांच्या २०१२ मधील या कामगिरीची दखल गिनेस बुक्‍स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसनेही घेतली होती. जामसेन्पा यांनी आतापर्यंत पाच वेळी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली आहे. या मोसमात आतापर्यंत १२० हून अधिक गिर्यारोहकांनी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली आहे.