नशिबामुळेच मलेशियाविरुद्ध जिंकू शकलो

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

मुंबई - केवळ नशिबाची साथ असल्यामुळेच आशियाई चॅंपियन्स करंडक हॉकी स्पर्धेतील अखेरच्या लढतीत मलेशियास हरवू शकलो, असे मत भारतीय मार्गदर्शक रोएलॅंट ऑल्टमन्स यांनी व्यक्त केले.

मुंबई - केवळ नशिबाची साथ असल्यामुळेच आशियाई चॅंपियन्स करंडक हॉकी स्पर्धेतील अखेरच्या लढतीत मलेशियास हरवू शकलो, असे मत भारतीय मार्गदर्शक रोएलॅंट ऑल्टमन्स यांनी व्यक्त केले.

रूपिंदरपाल सिंगने काही मिनिटे असताना केलेल्या गोलमुळेच भारताने या स्पर्धेतील आपल्या अखेरच्या साखळी लढतीत मलेशियास पराजित केले आणि गुणतक्‍त्यातील अव्वल स्थान निश्‍चित केले. या सामन्यातील कामगिरीने मार्गदर्शक निराश झाले. नशिबाची साथ असल्यामुळेच अखेर निकाल आमच्या बाजूने लागला. अखेरच्या सत्रात आमचा एक खेळाडू कमी होता. या परिस्थितीत खेळाचा वेग वाढवत प्रतिस्पर्ध्यांवर दडपण ठेवणे आवश्‍यक होते. यासाठी वेगवान प्रतिआक्रमण आवश्‍यक होते. यापैकी एका प्रतिआक्रमणावर पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि त्यावर गोल झाला, असे ऑल्टमन्स म्हणाले.

सुरेंदरवर दोन सामन्यांसाठी बंदी
भारतीय बचावाचा आधारस्तंभ असलेल्या सुरेंदर कुमार याच्यावर धसमुसळा खेळ केल्याबद्दल दोन सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. चेंडूवरील चकमकीत सहभागी नसतानाही सुरेंदरची स्टिक मलेशियन खेळाडूच्या पायावर लागली. त्याबद्दल त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सुरेंदर आता या स्पर्धेत खेळू शकणार नाही. याचबरोबर भारतीय खेळाडू आकाशदीपला कोपर मारणाऱ्या मलेशियाच्या आशन फिरहान याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.

भारतीय खेळाडू आमच्यापेक्षा जास्त अनुभवी आहेत. त्यांचे चेंडूवरील नियंत्रणही जबरदस्त आहे. त्यांनी यामुळे प्रतिआक्रमणात पेनल्टी कॉर्नर मिळवला. त्यामुळेच ते जिंकू शकले.
- स्टीवन व्हॅन हुईझेन, मलेशिया मार्गदर्शक.

क्रीडा

मुंबई - जागतिक कुस्तीतील निर्णय अधिक अचूक होण्यासाठी मॅटभोवतालच्या कॅमेऱ्यांत वाढ करण्यात आली आहे. पॅरिसला आजपासून सुरू झालेल्या...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

मुंबई - स्वप्नील धोपाडेने एम. आर. ललित बाबूविरुद्धची लढत बरोबरीत सोडवून राष्ट्रीय प्रीमियर बुद्धिबळ स्पर्धेतील प्रवेश निश्‍चित...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली - पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान संघ आशिया करंडक हॉकी स्पर्धेसाठी पुन्हा एकदा एकाच गटात आले आहेत. भारतात...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017