‘आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेतून पुनरामगन’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

नवी दिल्ली - पाच वेळची भारताची विश्‍वविजेती आणि लंडन ऑलिंपिक ब्राँझपदक विजेती मेरी कोम हिने या वर्षी व्हिएतनाम येथे होणाऱ्या आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेतून पुनरागमन करण्याची शक्‍यता बोलून दाखवली आहे. 

राज्यसभेत खासदार असलेल्या मेरी कोमने गेल्या वर्षी झालेल्या जागतिक स्पर्धेनंतर एकाही स्पर्धेत सहभाग घेतलेला नाही. आपण निवृत्तीचा विचार निश्‍चित केलेला नाही; पण फार मोठे उद्दिष्टही बाळगलेले नाही, असे तिने सांगितले. ती म्हणाली, ‘‘निश्‍चितच मी निवृत्तीचा विचार केलेला नाही. मी अजूनही रोज सराव करत आहे. आणखी एक वर्ष तरी खेळण्याचे माझे स्वप्न आहे.’’

भारताच्या विशेष खेळाडूंच्या हिवाळी क्रीडा स्पर्धेतील सहभागी खेळाडूंचा तिच्या हस्ते गौरव करण्यात आला. ऑस्ट्रियात झालेल्या विशेष खेळाडूंच्या हिवाळी क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने ३७ सुवर्ण, १० रौप्य आणि २६ ब्राँझ अशी एकूण ७३ पदके जिंकली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी ती बोलत होती. ती म्हणाली, ‘‘माझे लक्ष्य सध्या आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेचे आहे. नोव्हेंबरमध्ये व्हिएतनाम येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळविण्याचा माझा पहिला प्रयत्न असेल. त्यानंतर भारतासाठी पदक मिळविण्याचे माझे लक्ष्य असेल.’’ 

मेरीला सध्या केंद्र सरकारच्या वतीने बॉक्‍सिंगसाठी राष्ट्रीय निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या माध्यमातून ऑलिंपिकच्या दृष्टीने नियोजन करून भारतीय खेळांडूना तयारीसाठी सहकार्य करण्याचे आणि सरकारच्या क्रीडा प्रसार योजना प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी तिच्यावर सोपविण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीबद्दल मेरी कोम म्हणाली, ‘‘सरकारने माझ्यावर जी काही जबाबदारी दिली आहे, ती पूर्ण करण्यासाठी मी शंभर टक्के योगदान देईल. देशातील बॉक्‍सिंग खेळाडूंना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याला माझे प्राधान्य असेल.’’

अलीकडच्या काळात भारतातील अनेक बॉक्‍सिंग खेळाडू व्यावसायिक होण्याचा मार्ग पत्करत आहेत; पण माझा व्यावसायिक बॉक्‍सिंग खेळाडू होण्याचा अजिबात विचार नाही.
- मेरी कोम

Web Title: Asian Champions Cup