Asian Games 2018 : भरवशाच्या सुशीलकुमारकडून निराशा

Sushilkumar
Sushilkumar

जाकार्ता - कुस्तीमध्ये भारताला खरे तर सुरवातीलाच धक्का बसला. डबल ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमार पात्रता फेरीचा अडथळाही दूर करू शकला नाही. बहारिनच्या आदमविरुद्ध सुरवातीला मिळविलेल्या आघाडीचा त्याला फायदा घेता आला नाही. दुसऱ्या फेरीत सुशीलला आक्रमकच होता आले नाही. आदमविरुद्ध दुसऱ्या फेरीत तो चपळताही दाखवू शकला नाही. बचावाच्या आघाडीवरदेखील तो निष्प्रभ ठरला. त्यामुळेच त्याला ५-३ असा परभव पत्करावा लागला. 

संदीप तोमरने ५७ किलो वजनी गटात पहिल्या फेरीत तुर्कमेनिस्तानच्या रुस्तम नझरोला याला अटीतटीच्या लढतीत १२-८ असे पराभूत केले; पण दुसऱ्या फेरीत तो इराणच्या रेझाचे आक्रमण पेलू शकला नाही. अर्थात, बलाढ्य रेझाला दिलेली झुंजही संदीपचे भवितव्य उज्ज्वल असल्याची साक्ष देत होती. संदीप ९-१५ असा हरला असला, तरी क्षणाक्षणाला डावपेचांची होणारी उधळण आणि लढतीचा बदलणारा निर्णय रोमांचकारक ठरला. पवन कुमारने ८६ किलो वजनी गटात कंबोडियाच्या हेंद युथीविरुद्ध ८-० असा विजय मिळवून झकास सुरवात केली; पण इराणच्या हसन याजदानीकडून तो ११-० असा हरला. रेपिचेजमध्येही तो टिकला नाही. मौमस खत्रीला ९७ किलो वजनी गटात उझबेकिस्तानच्या इब्रा जिमोवचे आव्हान पहिल्याच फेरीत पेलवले नाही.

हा खेळाचा भाग झाला. मी सध्या माझी शरीरयष्टी राखण्यावर भर देत आहे. आज मी तीन मिनिटांनंतर प्रतिआक्रमणच करू शकलो नाही. आता पुढील लक्ष्यावर माझे लक्ष केंद्रित करेन.
- सुशील कुमार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com