बांगलादेश प्रथमच खेळणार भारतात कसोटी

वृत्तसंस्था
बुधवार, 3 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली - बांगलादेश क्रिकेट संघ प्रथमच पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये भारतात कसोटी सामना खेळणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात एकमेव कसोटी हैदराबाद येथे खेळविली जाणार आहे.

बांगलादेश क्रिकेट संघाला 2000 साली कसोटी संघाचा दर्जा मिळाला होता. तेव्हापासून आतापर्यंत एकदाही बांगलादेशचा संघ कसोटी मालिकेसाठी भारताच्या दौऱ्यावर आलेला नव्हता. अखेर बांगलादेशचा संघ भारतात कसोटी सामना खेळताना दिसणार आहे.

बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि बांगलादेश यांच्यात हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 8 ते 12 फेब्रुवारीदरम्यान कसोटी सामना खेळविला जाणार आहे. बांगलादेशचा हा पहिला भारत दौरा असेल. जगभरातील प्रत्येक कसोटी संघांना भारताविरुद्ध खेळण्याची संधी मिळण्यासाठी या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

क्रीडा

मुंबई - अमेरिकेविरुद्ध सफाईदार विजय संपादलेल्या भारतीय पुरुष संघास जागतिक सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत दुबळ्या इजिप्तविरुद्ध निसटत्या...

09.45 AM

पुणे - खेड शिवापूर येथील उदयोन्मुख रायडर युवराजसिंह कोंडे देशमुख याने आशियाई मोटोक्रॉस मालिकेतील दुसऱ्या फेरीत दुसरा क्रमांक...

09.45 AM

‘कामगिरी कर; अन्यथा...’ बीसीसीआयकडून इशाऱ्याचे वृत्त नवी दिल्ली - क्रिकेट सल्लागार समितीने प्रशिक्षकपदासाठी हिरवा कंदील...

09.45 AM