भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

'ओप्पो'कडून प्रायोजकत्वासाठी बीसीसीआयबरोबर पाच वर्षांसाठी 1,079 कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. आयसीसीच्या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यासाठी कंपनीकडून 1.56 कोटी रुपये आणि भारतीय संघ सहभागी असलेल्या परदेशातील सामन्यांसाठी 4.61 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

नवी दिल्ली - चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेपूर्वी भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण आज (गुरुवार) करण्यात आले. मोबाईल कंपनी 'ओप्पो' कंपनी भारतीय संघाची प्रायोजक आहे.

चॅम्पियन करंडक स्पर्धेत सहभागी होण्याबाबत भारतीय संघाचा अद्याप निर्णय झालेला नाही. त्यापूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सीईओ राहुल जोहरी यांनी आज नव्या जर्सीचे अनावरण केले. मर्यादित षटकांच्या सामन्यात भारतीय संघ परिधान करत असलेल्या जर्सीप्रमाणेच ही जर्सी आहे. मात्र, त्यावर 'ओप्पो'चा लोगो असणार आहे.

'ओप्पो'कडून प्रायोजकत्वासाठी बीसीसीआयबरोबर पाच वर्षांसाठी 1,079 कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. आयसीसीच्या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यासाठी कंपनीकडून 1.56 कोटी रुपये आणि भारतीय संघ सहभागी असलेल्या परदेशातील सामन्यांसाठी 4.61 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. सध्या भारतीय संघाचे प्रायोजक असलेल्या स्टार इंडियाने पुन्हा बोली लावण्यास नकार दिल्याने नवा प्रायोजक शोधण्यात आला.