बीसीसीआयची सूत्रे अखेर मुद्‌गल सांभाळणार?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट मंडळाच्या कार्यकारिणीतील उपाध्यक्ष, तसेच वरिष्ठ पदाधिकारी हंगामी अध्यक्ष तसेच सचिव होण्यास अपात्र ठरत आहेत. या परिस्थितीत माजी न्यायाधीश मुकुल मुद्‌गल हे अंतरिम अध्यक्ष होतील अशी चर्चा आहे. त्यांच्या नावाची शिफारस लोढा समितीच करणार असल्याची चर्चा सुरू आहे.

नोव्हेंबरमध्ये लोढा समितीने भारतीय मंडळाची कार्यकारिणी बरखास्त करून त्याऐवजी माजी गृहसचिव जी. के. पिल्लई यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्याची सूचना केली होती. मात्र, त्यास भारतीय मंडळाने विरोध केला होता. न्यायालयाने निरीक्षकांऐवजी समिती असावी असे सुचवले आहे. या परिस्थितीत मधला मार्ग म्हणून मुकुल मुद्‌गल यांच्याकडे बीसीसीआयची सूत्रे देण्याचा सर्वमान्य तोडगा होत असल्याचे समजते.

मुद्‌गल हे दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे निरीक्षक होते. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची नियुक्ती केली होती. विश्‍वकरंडक ट्‌वेंटी 20, तसेच आयपीएलमधील लढतींच्या आयोजनासाठी मुद्‌गल यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर भारत आणि आफ्रिका यांच्यातील दिल्लीतील कसोटीच्यावेळी मुद्‌गल हेच निरीक्षक होते. त्यानंतर मुद्‌गल यांनीच दिल्ली संघटनेतील त्रुटी तसेच गैरव्यवहाराबद्दलचा अहवाल न्यायालयात सादर केला होता.