दृष्टीहीन स्टेफनने आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात त्रिशतक ठोकून केले वर्ल्ड रेकॉर्ड

Blind ODI International Match Steffan Nero Australian Opener hit Triple Century
Blind ODI International Match Steffan Nero Australian Opener hit Triple Century esakal

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टेफन नेरोने (Steffan Nero) इतिहास रचला. या डावखुऱ्या सलामीवीराने दृष्टीहीन आंतरराष्ट्रीय वनेड सामन्यात त्रिशतक ठोकले. नेरोने न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात 140 चेंडूत 309 धावांची दमदार खेळी केली. याचबरोबर तो दृष्टीहीन क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज देखील ठरला. पाकिस्तानचा विकेटकिपर फलंदाज मसूद जनने 1998 मध्ये दृष्टीहीन वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत 262 धावांची खेळी केली होती. (Blind ODI International Match Steffan Nero Australian Opener hit Triple Century)

Blind ODI International Match Steffan Nero Australian Opener hit Triple Century
'त्यानंतर तो काही करत नाही', कपिल देव यांनी सॅमसनबद्दल लावला निराशेचा सूर

स्टेफन नेरोने आपल्या 309 धावांच्या खेळीत 49 चौकार आणि एक षटकार मारला. हा षटकात त्याने रिव्हर्स स्विप मारत ठोकला होता. यापूर्वी नेरोने आधीच्या दोन सामन्यात 46 चेंडूत 113 तर 47 चेंडूत 101 धावांची खेळी केली होती. आता त्याने सलग तिसऱ्या सामन्यात शतकी खेळी केली. या खेळीनंतर नेरो म्हणाला, 'ऑस्ट्रेलियाकडून खेळणे हे स्वप्न होते. ऑस्ट्रेलियाकडून खेळताना शतकी खेळी करणे हा अविस्मरणीय क्षण आहे.' नेरो हा सर्व प्रकराच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून त्रिशतक ठोकणारा आठवा फलंदाज ठरला आहे.

दरम्यान, नेरोच्या या दमदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 40 षटकात 2 बाद 541 धावा केल्या होत्या. न्यूझीलंड विरूद्धचा हा सामना ऑस्ट्रेलियाने 269 धावांनी जिंकला. न्यूझीलंडला या मालिकेत अजूनपर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. ऑस्ट्रेलियाने 6 सामने जिंकले असून या मालिकेतील अजून दोन सामने शिल्लक आहेत.

Blind ODI International Match Steffan Nero Australian Opener hit Triple Century
ICC Ranking : टी 20 क्रमवारीत इशान किशनची तब्बल 68 अंकांची उडी

वनडे सामन्यात सर्वाधिक मोठी खेळी करण्याचा विक्रम भारताच्या रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने 2014 मध्ये श्रीलंकेविरूद्ध कोलकात्यात 264 धावांची खेळी केली होती. रोहितशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला वनडेत 250 चा टप्पा गाठता आलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com