Blog : अँड्र्यू सायमंड्स म्हणजे जिथं कमी तिथं आम्ही!

Blog About Andrew Symonds
Blog About Andrew Symondsesakal

ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षापासून बरीच उलथापालथ होत आहे. ही उलथापालत होत असतानाच काही धक्कादायक वृत्तांनी ऑस्ट्रेलियाच नाही तर संपूर्ण क्रिकेट जगत हादरून गेले. शेन वॉर्नच्या गुढ मृत्यूचा शोक अजून संपत नाही तोच ऑस्ट्रेलियाचा जगविख्यात अष्टपैलू अँड्र्यू सायमंड्सच्या (Andrew Symonds) अपघाती मृत्यूची बातमी येऊन धडकली. रविवारी सकाळी सकाळी ही बातमी आली आणि तो धिप्पाड शरीरयष्टीचा सायमंड डोळ्यासमोर उभा राहिला. अँड्र्यू सायमंड्स म्हटलं की प्रत्येक भारतीयाच्या डोक्यात सर्वात प्रथम मंकी गेट प्रकरणच फ्लॅश होतं. ते साहजिकच आहे. कारण ज्या महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेतून अश्वेतांच्या हक्काचा लढा उभारला त्या महात्मा गांधींनी राष्ट्रपिता मानणाऱ्या भारताच्या क्रिकेट संघावर वर्णद्वेशाचे शिंतोडे उडवणारे हे प्रकरण होते.

Blog About Andrew Symonds
केवळ सायमंड्स नव्हे तर 'या' क्रिकेटपटूंचाही रस्ते अपघातात मृत्यू

गुणवत्तेला वादाची किनार

सायमंड्सच्या 46 वर्षाच्या कारकिर्दित मंकी गेट हे एकच वादग्रस्त प्रकरण नव्हते. सायमंड्स म्हणजे वादांची मालिकाच होती. त्यामुळेच त्याची कारकिर्द ऐन भरात असताना संपली. कधी दारू पिऊन धिंगाणा घालणं, आपल्या रग्बीचे डावपेच नग्नावस्थेत मैदानावर घुसखोरी करणाऱ्याविरूद्ध वापरणे, टीम मिटिंग सोडून मासेमारी करणे, मारामारी करणे असे अनेक वाद सायमंड्सच्या नावापुढे चिकले आहेत. ज्यावेळी हे वाद उद्भवले त्यावेळी सायमंड्स हा कारकिर्दिच्या ऐन भरात होता त्यावेळी अनेकदा त्याने आपल्या बहूआयामी कौशल्याच्या आधारे ऑस्ट्रेलियाला अशक्यप्राय असे विजय मिळवून दिले होते. मात्र वादामुळे या सर्व गोष्टी झाकोळून गेल्या होता. सायमंड्स नावाच्या पिक्चरचा वाद हा एक भाग होता, संपूर्ण पिक्चर नाही.

सायमंड्स आणि वाद हे हातात हात घालून चालत होते. मात्र सायमंड्स वादग्रस्त असला तरी तो एका क्रिकेटिंग एराचा स्टार खेळाडू होता. विशेष म्हणजे ज्या काळात ऑस्ट्रेलियानं क्रिकेट (Australian Cricket) जगतावर अधिराज्य गाजवलं त्यावेळीच्या ऑस्ट्रेलिया संघाचा सायमंड्स हा एक उत्तम युटीलिटी प्लेअर होता. सायमंड्सला युटिलीटी प्लेअर म्हणण्याचे एक कारण आहे. सहसा फलंदाजीत आणि गोलंदाजीत देखील करणाऱ्या खेळाडूंना अष्टपैलू खेळाडू (All Rounder) म्हणतात. मात्र सायमंड्स हा अष्टपैलू खेळाडूच्या व्याख्येपेक्षा एक काकण चढच होता.

Blog About Andrew Symonds
'हे फक्त एक वाईट स्वप्न असावं...'सायमंड्सची शेवटची इन्स्टा पोस्ट होतीय व्हायरल

क्लासी नसला तरी उपयुक्त होता

ज्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघात हेडन, पाँटिंग, गिलख्रिस्ट, मॅग्रा, शेन वॉर्न, मायकल क्लार्क यासारख्या दिग्गज खेळाडूंचा भरणा होता. त्याच संघात अँड्यू सायमंड्स देखील होता. वर उल्लेख केलेले खेळाडू हे स्टार होते, दिग्गज होते, क्लासी होते. मात्र सायमंड्सचं तसं नव्हतं. त्याने ज्यावेळी आपली कारकिर्द सुरू केली त्यावेळी तो एक अष्टपैलू खेळाडू होता. त्याच्याकडे पाँटिंग, हेडन आणि गिलख्रिस्टसारखे डोळ्याचे पारणे फेडणारे क्लासी शॉट्स नव्हते. मात्र त्याच्याकडे जबरदस्त शक्ती आणि इच्छाशक्ती होती. तो मॅच फिनिशरची भुमिका उत्तम प्रकारे निभावायचा. कधी कधी ऑस्ट्रेलियाचे रथी महारथींनी लवकर गाशा गुंडाळलाच तर डाव सावरायचा. त्याने 2003 च्या वर्ल्डकपमधील आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरूद्ध नाबाद 143 धावांची खेळी केली. ज्यावेळी ऑस्ट्रेलियाची अवस्था 4 बाद 86 अशी होती. सायमंड्सच्या या झुंजार खेळीने ऑस्ट्रेलियाने 8 बाद 310 धावा उभारल्या.

कधी वेगाची कास धरली तर कधी फिरकीची

अँड्र्यू सायमंड्सकडे ब्रेट ली सारखा वेग, मॅग्रासारखे नियंत्रण आणि स्विंग नव्हते. त्याच्याकडे शेन वॉर्न एवढा स्पिन देखील नव्हता. मात्र त्याच्याकडे जमलेली जोडी फोडण्याची, कर्णधारासाठी षटके काढून देण्याची क्षमता होती. ज्यावेळी खेळपट्टी वेगावान गोलंदाजांना उपयुक्त असते तेव्हा सायमंड्स वेगवान गोलंदाजी करत असे. मात्र ज्यावेळी खेळपट्टी फिरकीला साथ देत असे त्यावेळी तो ऑफ स्पिन टाकून आपल्या कर्णधाराचे काम हलके करून द्यायचा. त्याच्या फिल्डिंगबाबत तर काही बोलायलाच नको. त्याच्याकडे चेंडू जात असताना तुम्ही अतिरिक्त धाव घेण्याचे धाडस करूच शकत नाही. असे अवलिया अष्टपैलू खेळाडू फार कमी असतात. म्हणूनच त्याला अष्टपैलू खेळाडू म्हणण्याच्या ऐवजी युटिलीटी प्लेअर (Utility Player) म्हटले पाहिजे. तो कोणत्याही परिस्थिती आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखवायचा. अँड्र्यू सायमंड्स म्हणते जिथं कमी तिथं आम्ही!

Blog About Andrew Symonds
IPL च्या मानधनाने कालवलं जीवलग दिग्गजांच्या मैत्रीत विष

असा हा युटिलीटी प्लेअर ज्यावेळी त्याचा सुवर्णकाळ सुरू होता त्यावेळी वादाच्या भोवऱ्यात अडकत गेला. सामंड्स सारख्या खेळाडूंची मोठी डिमांड असणारे टी 20 युग सुरू असतानाच सततच्या वादामुळे सायमंड्स व्हिलन होत गेला. अखेर त्याची ऑस्ट्रेलियाच्या संघातून गच्छंती झाली. ऑस्ट्रेलियाच्या संघातून त्याला डच्चू मिळाला त्यावेळी त्याच्यावर आयपीएलमध्ये मोठ मोठ्या बोली लागत होत्या. मात्र देशाकडून खेळणे हे वेगळेच असते. जसजसे सायमंड्सचे वय वाढत गेले तसतसे त्याला आपण काय गमावले याची उपरती होत गेली. मात्र तेव्हा वेळ निघून गेली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com