"बॉल टॅम्परिंग' प्रकरणानंतर वॉर्नरच्या पत्नीचा गर्भपात 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 मे 2018

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार डेव्हिड वॉर्नर याच्या पत्नीचा ताण असह्य होऊन गर्भपात झाल्याचे उघड झाले आहे. कॅंडीसने स्वतः ही माहिती "ऑस्ट्रेलियन वूमन्स' या साप्ताहिकाला दिली आहे. 

सिडनी - दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार डेव्हिड वॉर्नर याच्या पत्नीचा ताण असह्य होऊन गर्भपात झाल्याचे उघड झाले आहे. कॅंडीसने स्वतः ही माहिती "ऑस्ट्रेलियन वूमन्स' या साप्ताहिकाला दिली आहे. 

वॉर्नरची दक्षिण आफ्रिकेहून मायदेशी रवानगी करण्यात आली. सिडनीतील पत्रकार परिषदेत माफी मागताना त्याला अश्रू अनावर झाले. यानंतर एका आठवड्याने हे घडले. कॅंडीसने सांगितले की, या प्रकरणाचा ताण आला होता, तसेच मायदेशी परतण्यासाठी प्रदीर्घ विमान प्रवासामुळे तो वाढला. घरी आल्यानंतर एके दिवशी रक्तस्त्राव होऊ लागल्यामुळे मी बाथरुममध्ये गेले. तेव्हाच माझ्या हे लक्षात आले. नंतर आम्ही एकमेकांच्या गळ्यात पडून रडलो. गरोदर असल्याचे मला केपटाऊनमध्ये कळले होते. त्यामुळे आम्ही आनंदात होतो. त्यानंतर चेंडू कुरतडण्याचे प्रकरण घडले. डेव्हिडला खरे तर स्टीव स्मिथ आणि कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट यांच्यासह एकाच विमानातून मायदेशी परत जायचे होते, पण आम्हाला वेगळे पाठविण्यात आले. त्याशिवाय जास्त वेळ लागणाऱ्या विमानातून आम्हाला जावे लागले. 23 तासांच्या प्रवासानंतर विमानतळावर प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामुळे मी आणखी खचले. मी गरोदर असल्याची तेव्हा कुणालाच कल्पना नव्हती. अखेरीस त्या भयंकर दौऱ्याचा असा हृदयद्रावक अंत झाला.' 

वॉर्नरला दोन मुले आहेत. पहिल्या कसोटीदरम्यान त्याचा क्विंटन डीकॉक याच्याशी वाद झाला. डीकॉकने पत्नीविषयी अश्‍लील उद्गार काढल्याचा दावा वॉर्नरने केला होता.

Web Title: Candice Warner reveals miscarriage after cricket scandal