कार्लसनच्या अमेरिकनप्रेमाची चर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

न्यूयॉर्क - विश्‍वनाथन आनंदविरुद्धच्या बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीत सुरवातीस आघाडी घेण्यासाठी जरा जास्तच आक्रमक असलेला मॅग्नस कार्लसन सर्गी कर्जाकिनविरुद्धच्या लढतीच्या तुलनेत बचावात्मक दिसत आहे. किंबहुना या लढतीबद्दल आपल्याकडून असलेल्या अपेक्षा कमी करण्याचाच प्रयत्न त्याने पहिल्या दोन डावांत केल्याचे दिसत आहे. लढतीत रविवार विश्रांतीचा दिवस होता.

बारा डावांच्या या लढतीतील पहिले दोन डाव बरोबरीत सुटले आहेत आणि भारतीय वेळेनुसार सोमवारी मध्यरात्री होणाऱ्या तिसऱ्या डावात कार्लसनचे पांढरे मोहरे असतील. पहिल्या दोन डावांतील बरोबरी धक्कादायक नाही. जागतिक लढतीत हे अपेक्षितच आहे. या लढतीतील अद्याप १० डाव शिल्लक आहेत.

कर्जाकिन अर्थात कार्लसनच्या आगळ्या चालीने डगमगलेला नाही. कर्जाकिनने कार्लसनच्या ई-४ या आवडत्या पहिल्या चालीस उत्तर देण्यासाठी सिसिलियन बचावात्मक पद्धतीची जोरदार तयारी केल्याची चर्चा आहे. कदाचित त्यामुळेच कार्लसन काहीसा बचावात्मक असावा, असेही तज्ज्ञांचे मत आहे.

टॅग्स

क्रीडा

मुंबई - विश्‍वनाथन आनंद आणि गॅरी कास्पारोव यांच्यातील दोन दशकांपूर्वीच्या जागतिक विजेतेपदाच्या लढतीच्या आठवणींना उजाळा देणारी...

10.24 AM

न्यूयॉर्क - आगामी अमेरिकन ओपन या मोसमातील अखेरच्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेसाठी रशियाची टेनिसपटू मारिया शारापोवा हिला ‘वाईल्ड कार्ड’...

10.24 AM

लंडन - न्यूझीलंडची कर्णधार सूझी बेटस्‌ हिने किआ सुपर लीग टी-२० स्पर्धेत शतक झळकावण्याचा पराक्रम केला. तिने अवघ्या ६३ चेंडूंत...

10.09 AM