द्रोणावली हरिकाही दुसऱ्या फेरीत दाखल 

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

मुंबई : द्रोणावली हरिकाने जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीत बांगलादेशच्या अख्तर लिझा शमिमा हिचा रॅपिड टायब्रेकरमध्ये पराभव केला. पद्मिनी राऊतनेही यापूर्वीच दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. 

तेहरानला सुरू असलेल्या या स्पर्धेत हरिकाला चौथे मानांकन आहे. ती शमिमाचा सहज पराभव करेल, असेच वाटले होते; पण निर्धारित दोन डावांनंतर शमिमाने बरोबरीची कोंडी कायम ठेवली. टायब्रेकरच्या रॅपिड डावात हरिकाने पहिली लढत जिंकली आणि दुसरी लढत काळे मोहरे असताना बरोबरीत सोडवत अखेर 2.5-1.5 असा विजय मिळविला. हा दुसरा डाव 75 चालींपर्यंत रंगला होता. 

हरिकाची लढत आता कझाकस्तानच्या दिना सादुकासोवा हिच्याविरुद्ध होईल. पद्मिनी राऊतसमोर आठव्या मानांकित झाओ झू हिचे आव्हान असेल. झाओने 2002 मध्ये जागतिक कुमारी स्पर्धा जिंकली आहे. पद्मिनीने सलामीच्या फेरीत आर्मेनियाच्या एलिना दॅनिएलियन हिला 1.5-0.5 असे हरवले होते.

Web Title: Chess Dronavali Harika sports