सुमीत, विनेशची अपराजित मालिका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

कुस्तीत शनिवारी भारतीयांनी तीन पदके मिळविली. यात सुमीत मलिक आणि विनेश फोगट यांनी अपराजित मालिका राखत सुवर्णपदक जिंकले. ऑलिंपिक ब्राँझ विजेत्या साक्षी मलिकला मात्र सुवर्णपदकाची अपेक्षा पूर्ण करता आली नाही.

विनेशला रिओ ऑलिंपिकमध्ये गंभीर दुखापतीमुळे अपयश आले होते. या वेळी तिने ५० किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविले. तिरंगा परिधान करून प्रेक्षकांना अभिवादन करताना ती भावविवश झाली होती. विनेशने नायजेरियाची मैसीन्नई जेनेसीस, ऑस्ट्रेलियाची रुपिंदर कौर आणि कॅनडाची जेसिका मॅक्‍डोनाल्ड यांना हरविले.

सुमीतनेही (१२५ किलो फ्रीस्टाइल) सलग तीन विजय मिळविले. पहिल्या लढतीत त्याला पुढे चाल मिळाली. त्यानंतर त्याने कॉरी जार्व्हीस, पाकिस्तानचा तयाब रझा व नायजेरियाचा सिनीव्हीए बोल्टीक यांना हरविले. 

सोमवीरने (८६ किलो फ्रीस्टाईल) कॅनडाच्या अलेक्‍झांडर मुरला हरवून ब्राँझ मिळविले.

साक्षीने (६२ किलो) पहिल्या फेरीत कॅमेरूनच्या बर्थी एमिलीएनीला हरविले; पण त्यानंतर ती कॅनडाच्या मिशेली फॅझ्झारी हिच्याकडून हरली. मग नायजेरियाच्या अमिनात अदेनियीकडून हरल्यामुळे तिच्या सुवर्णपदकाच्या आशा संपुष्टात आल्या. अखेरीस तिने न्यूझीलंडच्या टॅयला फोर्डला हरवून ब्राँझ मिळविले.

Web Title: Commonwealth Games Gold Coast wrestling Sumit Malik and Vineesh Phogat