'अरे हा इतका जाडा आहे की...' पंतच्या फिटनेसवर पाकिस्तानी खेळाडूंची टिप्पणी

पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरियाने ऋषभ पंतच्या फिटनेसवर निशाणा साधला आहे.
danish kaneria raised questions on captain rishabh pant fitness he is overweight
danish kaneria raised questions on captain rishabh pant fitness he is overweight

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची T20 मालिका खेळवली जात आहे. केएल राहुलच्या दुखापतीनंतर पंतकडे संघाची कमान सोपवण्यात आली होती. तेव्हापासून मालिका संपेपर्यंत पंतच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता त्यामध्ये पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरियाने ऋषभ पंतच्या फिटनेसवर निशाणा साधला आहे.(danish kaneria raised questions on captain rishabh pant fitness he is overweight)

भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज ऋषभ पंत दक्षिण आफ्रिकेसोबत खेळल्या जाणार्‍या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत बॅटने कमाल दाखवू शकला नाही. फलंदाजीत तो फ्लॉप ठरला पण, शेवटच्या सामन्यात मोठी खेळी खेळून मालिका जिंकण्याची त्याच्याकडे सुवर्णसंधी आहे.

danish kaneria raised questions on captain rishabh pant fitness he is overweight
इंग्लंडच्या बाजारात रोहित विराट करतायत कपड्यांची शॉपिंग, PHOTO व्हायरल

पाकिस्तानचा माजी खेळाडू दानिश कनेरियाने फिटनेसवर मोठा आरोप करत त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला की, ऋषभ पंत विकेट कीपिंग करताना पूर्णपणे बसू शकत नाही, हे माझ्या लक्षात आले आहे. जेव्हा कोणी वेगवान गोलंदाजी करतो तेव्हा पंत उभा राहतो. तो पायाच्या बोटांवर बसत नाही. अशा परिस्थितीत त्याला अडचणींचा सामना करावा लागत आहे. मला वाटतं वजन वाढल्यामुळे असं होत असेल. तो जाडा असल्याने खाली बसल्यावर लवकर वर येता येत नाही. हा त्याच्या फिटनेसबाबत चिंतेचा विषय असू शकतो. पंत १०० टक्के फिट आहे का?

danish kaneria raised questions on captain rishabh pant fitness he is overweight
'मला वाटत नाही तो पदार्पण करेल...' आकाश चोप्राची पुन्हा एकदा भविष्यवाणी

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा T20 सामना आज बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सध्या मालिका २-२ ने बरोबरी वर आहे. पंतच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया देशांतर्गत टी-20 मालिका जिंकून इतिहास रचू शकते. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध टी-20 मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com