रोईंगमध्ये भारताचा दत्तू भोकनळ उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था
शनिवार, 6 ऑगस्ट 2016

रिओ डि जानिरो : ऑलिंपिकमध्ये पदार्पण करणारा भारताचा रोईंगपटू दत्तू भोकनळ आज (शनिवार) उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला. ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेला दत्तू हा भारताचा एकमेव रोईंगपटू आहे. 

दत्तू भोकनळचा समावेश पहिल्याच ‘हिट‘मध्ये होता. सुरवातीपासून त्याने तिसरे स्थान कायम राखले. अर्थात, क्‍युबा आणि मेक्‍सिकोच्या रोईंगपटूंच्या तुलनेत दत्तूची वेळ काहीशी जास्त असली, तरीही पहिल्याच प्रयत्नामध्ये त्याने उपांत्यपूर्व फेरी गाठत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 

दत्तू भोकनळचा सहभाग असलेल्या या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी येत्या मंगळवारी (9 ऑगस्ट) सायंकाळी 5 नंतर होणार आहे. 
 
पहिल्या ‘हिट‘मधील निकाल : 
1 : रॉड्रिग्ज फॉर्निअर (क्‍युबा) : 7:06:89 
2 : जुआन कॅब्रेरा (मेक्‍सिको) : 7:08:27 
3 : दत्तू भोकनळ (भारत) : 7:21:67