18 वर्षांच्या दीपकने 'राष्ट्रकुल'मध्ये जिंकले ब्रॉंझ!

Deepak Lather at CWG18
Deepak Lather at CWG18

नवी दिल्ली : अवघ्या 18 वर्षांच्या दीपक लाठरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील वेटलिफ्टिंगमध्ये चमकदार कामगिरी करत पुरुषांच्या 69 किलो वजनी गटात ब्रॉंझ पदक जिंकले. यामुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताच्या खात्यात एकूण चार पदके जमा झाली आहेत. 

दीपक हा मूळचा हरियानातील शादीपूर येथील रहिवासी आहे. यापूर्वी त्याने पुण्यातील आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्युटमध्ये जलतरणासाठी नाव नोंदणी केली होती. त्यानंतर त्याने वेटलिफ्टिंगकडे मोर्चा वळविला. दीपकची ही पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा आहे. 

दोन वर्षांपूर्वी दीपकने राष्ट्रकुल क्रीडा युवा स्पर्धेतील विक्रम मोडला होता. आजच्या स्पर्धेत स्नॅचमध्ये दीपकने 132 किलो आणि 136 किलो वजन उचलत पदकाच्या शर्यतीत आघाडीवर गेला. पण तिसऱ्या प्रयत्नात 138 किलो वजन उचलण्यात त्याला अपयश आले. त्यामुळे दीपकच्या क्रमवारीत घसरण झाली. क्‍लीन अँड जर्कमध्ये इतर स्पर्धकांपेक्षा दीपकच सर्वांत कमी वजनाचा होता. त्याने 159 किलो वजन उचलत स्वत:ची सर्वोत्तम कामगिरी केली; पण तिसऱ्या प्रयत्नात 162 किलो वजन उचलण्यात त्याला अपयश आले. 

सामोआचा वैपोव्हा लोआनेला ब्रॉंझ जिंकण्याची संधी होती; पण त्याने ती दवडली. त्यामुळे ही संधी साधत दीपकने ब्रॉंझ जिंकले. दीपकने एकूण 295 किलो वजन उचलले. या गटात एकूण 299 किलो वजन उचलून वेल्सच्या गॅरेथ इव्हान्सने सुवर्ण, तर एकूण 297 किलो वजन उचलून श्रीलंकेच्या इंडिया दिसानायकेने रौप्य जिंकले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com