पुण्यातही होणार प्रकाशझोतात सामने

पीटीआय
शनिवार, 31 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - डेव्हिस करंडक पुरुष सांघिक टेनिस स्पर्धेत भारताच्या आगामी लढतीचे सामने प्रकाशझोतात होतील. पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात न्यूझीलंडविरुद्ध भारताची आशिया-ओशेनिया गटातील पहिल्या फेरीची लढत आहे. तीन ते पाच फेब्रुवारीदरम्यान ही लढत होईल.

अखिल भारतीय टेनिस संघटनेचे (एआयटीए) सरचिटणीस हिरण्मय चटर्जी यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे सरचिटणीस आणि स्पर्धा संचालक सुंदर अय्यर यांनी तसा प्रस्ताव मांडला होता. प्रेक्षकांचा जास्त प्रतिसाद मिळावा आणि भारतीय संघाला पाठिंबा लाभावा असा त्यांचा हेतू आहे. याविषयी निवड समितीचे अध्यक्ष एस. पी. मिश्रा यांनी खेळाडूंना विचारले. आम्ही आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाशी संपर्क साधला. तापमानामुळे फरक पडणार नव्हता. त्यामुळे आम्ही प्रस्ताव मान्य केला, असे त्यांनी सांगितले. संघटनेने खेळाडूंना पत्र पाठविले होते. बहुतेकांनी होकार दर्शविला.