दोन शर्यती जिंकून मिक शूमाकरची आघाडी

वृत्तसंस्था
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

मनामा (बहारीन) - जर्मनीच्या मीक शूमाकरने एमआरएफ चॅलेंज फॉर्म्युला २००० मालिकेत दोन शर्यती जिंकल्या. याबरोबरच त्याने पहिल्या फेरीअखेर आघाडी घेतली. दुसऱ्या शर्यतीत मीकने ज्योई मॉसन आणि राल्फ ॲरॉन यांना मागे टाकले. तिसऱ्या शर्यतीत ॲरॉनने बाजी मारली; पण चौथी शर्यत मीकने जिंकली. मीकचे ७५ गुण झाले. ॲरॉनचे ७२, तर मॉसनचे ६१ गुण झाले. मीक म्हणाला, की ही सुरवात उत्तमच आहे. एकूण कामगिरीबाबत मला आनंद वाटतो. अखेरच्या शर्यतीत जुरी व्हीप्सला मागे टाकणे महत्त्वाचे होते. या सर्किटवर ड्रायव्हिंग करणे आनंददायक ठरले. आता दुबईमध्ये होणाऱ्या पुढील फेरीसाठी मी उत्सुक आहे.

मनामा (बहारीन) - जर्मनीच्या मीक शूमाकरने एमआरएफ चॅलेंज फॉर्म्युला २००० मालिकेत दोन शर्यती जिंकल्या. याबरोबरच त्याने पहिल्या फेरीअखेर आघाडी घेतली. दुसऱ्या शर्यतीत मीकने ज्योई मॉसन आणि राल्फ ॲरॉन यांना मागे टाकले. तिसऱ्या शर्यतीत ॲरॉनने बाजी मारली; पण चौथी शर्यत मीकने जिंकली. मीकचे ७५ गुण झाले. ॲरॉनचे ७२, तर मॉसनचे ६१ गुण झाले. मीक म्हणाला, की ही सुरवात उत्तमच आहे. एकूण कामगिरीबाबत मला आनंद वाटतो. अखेरच्या शर्यतीत जुरी व्हीप्सला मागे टाकणे महत्त्वाचे होते. या सर्किटवर ड्रायव्हिंग करणे आनंददायक ठरले. आता दुबईमध्ये होणाऱ्या पुढील फेरीसाठी मी उत्सुक आहे. दुसरी शर्यत मीकने २० मिनिटे १८.३६५ सेकंद वेळेत जिंकली. तिसऱ्या शर्यतीत तो तिसरा आला. त्याची वेळ २१ मिनिटे २०.४७० सेकंद होती. चौथ्या शर्यतीत त्याची वेळ २० मिनिटे २०.८४३ सेकंद होती.

टॅग्स

क्रीडा

श्रीपेरंबुदूर - मुंबईच्या सौरव बंदोपाध्याय याने राष्ट्रीय रेसिंग मालिकेतील ॲमीओ करंडक स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतील पहिली शर्यत...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

लखनौ - नऊ सामन्यांत अवघा एकच विजय मिळवल्यामुळे प्रो- कबड्डीच्या पाचव्या मोसमात हेलकावे खात असलेल्या तेलुगू टायटन्सला यू मुम्बाने...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

आव्हान देण्याचीही श्रीलंका संघाची मानसिक तयारी नाही दाम्बुला - कसोटी मालिकेतील धवल यशानंतर श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित...

रविवार, 20 ऑगस्ट 2017