पराभवाने इंग्लंड संघ विचारमग्न

The England team thought of defeating England
The England team thought of defeating England

कार्डीफ : मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावरील पराभवाने इंग्लंड संघ विचारमग्न झाला आहे. अगदी नजीकच्या भूतकाळात याच इंग्लिश संघाने ऑस्ट्रेलियन संघाला सपाटून पराभूत केले होते. भारतासमोरच्या मालिकेत विजयाच्या लयीत इंग्लंडचा संघ जोमाने उतरला होता. जून महिन्यात एकापाठोपाठ मिळवलेल्या यशाची सर्व नशा भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात खाडकन् उतरवली. फलंदाजी आणि गोलंदाजीत स्पष्ट वरचढ खेळ भारतीय संघाने सहजी करून दाखवल्याने इंग्लंड संघ व्यवस्थापन विचारात गढून गेले आहे, की भारतीय संघाला दुसर्‍या सामन्यात पराभूत करून 3 सामन्यांची मालिका जिवंत कशी ठेवायची. 

कप्तान इयॉन मॉर्गनला दोन फिरकी गोलंदाजांना कसे खेळायचे याचे उत्तर शोधायचे आहे. "होय युझवेंद्र चहल चांगला गोलंदाज आहे पण त्याला खेळणे अशक्य नाही. कुलदीप यादव संपूर्णपणे वेगळा गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीत वेगळा वेग आहे ज्याचा त्याचा तो हुशारीने वापर करतो आणि सतत फलंदाजाला बाद करायचा विचार करतो. तसा गोलंदाज इंग्लंड क्रिकेटमधे नसल्याने सराव करणे अशक्य आहे. म्हणूनच कुलदीपला रोखणे हे मोठे आव्हान आहे", मॉर्गनने कबूल केले.

"पहिल्या सामन्यात सर्वकाही मनासारखे घडले. कुलदीपची गोलंदाजी आणि राहुलची फलंदाजीचा आम्ही सगळ्यांनी आनंद लुटला. कल्पना आहे की इंग्लंडचा संघ जोरदार पुनरागमन करू शकतो. ती ताकद त्यांच्या संघात आहे. आम्हांला एका विजयाने हुरळून जायची काहीच गरज नाहीये. एकच आहे की जर कार्डीफचा सामना जिंकला तर टी20 मालिका जिंकण्याची मजा लुटता येईल. अर्थातच दडपण यजमान संघावर आहे", कोहली कार्डीफच्या मैदानावर सरावाअगोदर भेटला तेव्हा डोळे मिचकावत म्हणाला.  

दोनही संघात मोठे बदल होण्याची शक्यता कमी वाटते आहे. मँचेस्टरच्या तुलनेत कार्डीफला हवा गार आहे. आकाशात ढग आहेत. इंग्लंड संघ दुसर्‍या सामन्याकरता खेळपट्टी एकदम कोरडी करू नका असा संदेश माळ्याला देत असणार. कोरड्या खेळपट्टीचा फायदा भारतीय फिरकी गोलंदाजांना कसा होतो हे पहिल्या सामन्यात दिसून आल्याने दुसर्‍या सामन्याची खेळपट्टी थोडी गवत असलेली राखली जायची शक्यता नाकारता येत नाही. कार्डीफला भारतीय संघ हाच एकमेव सामना खेळणार असल्याने प्रेक्षक गर्दी करतील असा विश्वास संयोजकांना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com