साईनाकडून वाढत्या अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

मुंबई - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपाठोपाठ आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतही आपली ताकद दाखवण्याचा साईना नेहवालचा इरादा आहे. वुहानला उद्यापासून (ता. २४) सुरू होत असलेल्या या स्पर्धेत साईनाला मानांकन नसले, तरी स्पर्धेतील विजेतेपदाच्या शर्यतीत तिचे नाव घेतले जात आहे.

साईनाला गेल्या आशियाई स्पर्धेत पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली होती, पण गोल्ड कोस्टमध्ये सिंधूला हरवून साईनाने आपण संपलो नसल्याची जाणीव करून दिली. सिंधूविरुद्ध आता तिचे ४-१ वर्चस्व आहे. लंडन ऑलिंपिक ब्राँझ पदकविजेती साईना गतवर्षी जपानच्या सायाको सातोविरुद्ध सलामीला पराजित झाली होती. याची पुनरावृत्ती नक्कीच यंदा अपेक्षित नाही. गतवर्षी ती गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करीत होती. तिने दोनदा या स्पर्धेत ब्राँझपदक जिंकले आहे.

जागतिक क्रमवारीत बारावी असल्यामुळे साईनाला स्पर्धेत मानांकन नाही, तसेच तिचा ड्रॉही खडतर आहे. सलामीला तिची लढत पात्रतेतून आगेकूच करणाऱ्या खेळाडूविरुद्ध होईल. त्यानंतर तिच्यासमोर नोझोमी ओकुहारा असेल. राष्ट्रकुल स्पर्धेत आक्रमक तसेच ताकदवान स्मॅश केलेली साईना मानांकनापेक्षा सरस खेळ करण्याचे लक्ष्य बाळगून आहे.

पात्रता फेरीने  स्पर्धेस सुरवात
आशियाई बॅडमिंटनला उद्या (ता. २४) सुरवात होणार असली, तरी प्रमुख खेळाडूंच्या लढती पहिल्या दिवशी होणार नाहीत. पहिल्या दिवशी पात्रता फेरीच्या लढती आहेत. साखळी पद्धतीने होणाऱ्या या पात्रता फेरीत प्रत्येक गटातील अव्वल खेळाडूस मुख्य स्पर्धेत स्थान मिळणार आहे.

Web Title: expectations from Saina in Asian Badminton Championship