आर्थिक संकट : पेट्रोल पंपावर चहा देताना दिसला श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू

भारताचा शेजारी देश असलेला श्रीलंका (Sri Lanka) मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे.
Roshan Mahanama
Roshan Mahanamaesakal

गेल्या काही दिवसांपासून जगभरात महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे. अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडले आहेत. भारताचा शेजारी देश असलेला श्रीलंका (Sri Lanka) मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. तेथील अनेकांवर उपासमीरीची वेळ आली आहे. दरम्यान, विश्वकप विजेता खेळाडू चहाचे वाटप करत नागरिकांच्या मदतीसाठी धावून आला आहे.

Roshan Mahanama
BCCI ने १२ महिन्यात 6 कॅप्टन का बदलले? द्रविडने दिलं उत्तर

श्रीलंकेत सध्या आर्थिक संकट सुरू आहे. अशा परिस्थितीत 1996 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेला श्रीलंकेचा क्रिकेटर रोशन महानामा(Roshan Mahanama) लोकांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. महानामा पेट्रोल पंपावर लोकांना जीवनावश्यक वस्तू पुरवत आहे. त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत ज्यात तो लोकांना चहा आणि बन सर्व्ह करताना दिसत आहे. श्रीलंकेसाठी या अत्यंत कठीण काळात महानामाने लोकांना एकमेकांना मदत करण्याचे आवाहन केले.

महानामा याने काही फोटो शेअर करताना, “आम्ही वॉर्ड प्लेस आणि विजेरामा मावठाभोवती पेट्रोलसाठी रांगेत उभे असलेल्या लोकांना चहा आणि बन देण्याचे काम केले. या रांगा दिवसेंदिवस लांबत चालल्या आहेत, अशा स्थितीत नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. कृपया इंधनाच्या रांगेत स्वतःची काळजी घ्या आणि एकमेकांना मदत करा. असे आवाहन त्याने तेथिल नागरिकांना केलं आहे.

Roshan Mahanama
श्रीलंका आर्थिक संकटाच्या गर्तेत

भारताचा शेजारी देश असलेला श्रीलंका (Sri Lanka) मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. श्रीलंकेत पेट्रोल (Petrol), डिझेलच्या किमतीने 400 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर अन्नधान्याच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत की, ते खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले आहे.

31 मे 1966 रोजी कोलंबोमध्ये जन्मलेल्या महानामाची गणना श्रीलंकेच्या दिग्गज खेळाडूंमध्ये केली जाते. त्याने श्रीलंकेसाठी 213 एकदिवसीय सामने आणि आणखी 52 कसोटी सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 4 शतके आणि 11 अर्धशतके आहेत आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 4 शतके आणि 35 अर्धशतकांसह 5162 धावा केल्या आहेत. 1996 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या श्रीलंकन ​​क्रिकेट संघाचाही तो भाग होता. विश्वचषक स्पर्धेनंतर १९९९ मध्ये महानमाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com