मातीत जन्मलो, मळलो आणि जिंकलोही!

मातीत जन्मलो, मळलो आणि जिंकलोही!

‘‘माती माझी आई, माती माझा पिता. मातीत जन्मलो, मातीत मळलो आणि मातीतच जिंकलो... असे भावपूर्ण मनोगत हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांनी व्यक्त केले. येथील राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे त्यांना शाहू पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी त्यांनी मनोगत वाचून दाखविले. कोल्हापूरच्या मातीत कसा घडलो, याचे विविध पदर त्यांनी मनोगतातून उलगडलेच. त्याशिवाय याच मातीशी इमान जपत कार्यरत असताना मिळालेल्या शाहू पुरस्काराने जगातील सर्वांत मोठा सन्मान मिळवण्याचे भाग्य लाभल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

आंदळकर यांच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रातील पैलवानांनी कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती. या हाऊसफुल्ल गर्दीच्या साक्षीनेच श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार दिला आणि साऱ्यांनी उभे राहून या रांगड्या हिंदकेसरीला मानवंदनाही दिली. रोख रुपये एक लाख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

शिवछत्रपतींच्या नावाच्या पुरस्काराचा अभिमान
शिलवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराची रक्कम किती का असेना, त्याच्याशी मतलब नाही. शिवछत्रपतींच्या नावे पुरस्कार मिळाला, याचाच मोठा आनंद आहे. त्यामुळे शासनाने शिवछत्रपतींच्या नावे नुसता नारळ आणि पानाचा विडा दिला तरी त्याचा मला अभिमान असेल, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर भावूकतेने बोलत होते. शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याचा जसा आनंद, त्याच पद्धतीने मल्लविद्येची होत असलेली पिछेहाट त्यांच्या शब्दा-शब्दांतून व्यक्त होत होती.  

अल्पपरिचय 

  •  गणपतराव आंदळकर यांचा जन्म १५ एप्रिल १९३५ ला सांगली         जिल्ह्यातील बत्तीस शिराळा तालुक्यातील पुनवत या गावी.
  •  वडिलांनी त्यांना कुस्तीच्या अधिक चांगल्या सरावासाठी  कोल्हापुरात मोतीबाग तालमीत, प्रसिद्ध वस्ताद बाबूराव बिरे यांच्याकडे शिकायला ठेवले.
  •  ते छत्रपती राजाराम महाराजांच्या काळातील नावाजलेले मल्ल होते.
  •  त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे शंभर मुले तालमीत राहत होती.
  •  १९६० ला मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल मैदानावर हिंदकेसरी या सर्वोच्च किताबासाठी दिल्लीचा त्यावेळेचा गाजलेला मल्ल खडकसिंग पंजाबीला त्यांनी चितपट केले.
  •  कोल्हापुरात त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत, प्रचंड     मिरवणूक, ठिकठिकाणी सत्कार
  •  १९६२ ला आशियाई क्रीडा स्पर्धेत जार्काता येथे हेवीवेट गटात त्यांनी सुवर्णपदक जिंकले.
  •  १९६४ ला टोकियो आलिंपिकमध्ये त्यांनी भारतीय कुस्ती संघाचे नेतृत्व करताना चौथ्या फेरीपर्यंत मजल मारली.
  •  कारकिर्दीत सुमारे दोनशे कुस्त्या खेळल्या. 
  •  गोगा पंजाबी, सादिक पंजाबी, जिरा पंजाबी, नसीर पंजाबी, मोती पंजाबी हे पाकिस्तानी मल्ल, मध्य प्रदेशातील मंगलराय, दिल्लीचे खडकसिंग पंजाबी, मोहन मथुरेवाला, अमृतसरचे बनातसिंग पंजाबी, पतियाळाचे रोहेराम, लिलाराम आणि कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीचे श्रीपती खंचनाळे, महमंद हनिफ, श्रीरंग जाधव यांच्याशी लढती झाल्या. 
  •  १९६८ पासून मोतीबाग तालमीत कुस्ती प्रशिक्षक.
  •  दादू चौगुले, चंबा मुत्नाळ, अग्नेल निग्रो, विष्णू जोशीलकर, रामचंद्र सारंग, संभाजी वरूटे या त्यांच्या तालमीत तयार झालेल्या मल्लांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरच्या कुस्तीचा लौकिक वाढविला. 
  •  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे ते उपाध्यक्ष होते.
  •  कोल्हापूरच्या राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. 
  •  १९६२ ला केंद्र सरकारने त्यांना अर्जुन पुरस्काराने गौरविले.
  •  कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र सरकारने त्यांना शिवछत्रपती पुरस्कार दिला.
  •  १९९० ला त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com