VIDEO : 12 चेंडूत 60 धावा ठोकणाऱ्या मॅक्सवेलने थोपटली बॉलरची पाठ

Glenn Maxwell Sportsmanship Video Viral
Glenn Maxwell Sportsmanship Video Viralesakal

Sri Lanka vs Australia : पहिल्या नवडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला दोन विकेट्सनी मात दिली. पावसाच्या व्यत्यय आलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने 50 षटकात 7 बाद 300 धावा केल्या होत्या. मात्र पावसामुळे ऑस्ट्रेलियाच्या डावातील षटके कमी करण्यात आली. त्यामुळे कांगारूंना 44 षटकात 282 धावांचे आव्हान पार करावे लागले. ऑस्ट्रेलियाचा सुरूवात देखील खराब झाली. मात्र त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) आक्रमक फटकेबाजी करत सामन्याचा चित्रच पालटले. (Glenn Maxwell Sportsmanship Video Viral)

Glenn Maxwell Sportsmanship Video Viral
खेळाडूंचं माहित नाही पण BCCI ला प्रत्येक चेंडूवर मिळणार 49 लाख रुपये

ग्लेन मॅक्सवेल फलंदाजी करण्यास आला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या 5 बाद 189 धावा झाल्या होत्या. त्यानंतर मॅक्सवेलने चौकार आणि षटकारांची आतशबाजी केली. त्याने 51 चेंडूत नाबाद 80 धावा केल्या. मॅक्सवेलने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 6 षटकार मारले. म्हणजे त्याने आपल्या खेळीतील 60 धावा या 12 चेंडूत सहा चौकार आणि सहा षटकार मारून केल्या.

Glenn Maxwell Sportsmanship Video Viral
बायो बबलमुळे टीम बॉडिंग वाढलं; आता जुळवून घ्यायला वेळ लागेल : ऋतुराज

जरी मॅक्सवेलने फलंदाजी करताना श्रीलंकेच्या गोलंदाजांना कोणतीही दया माया दाखवली नसली तरी नंतर खिलाडू वृत्ती (Sportsmanship) दाखवली. त्याने पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या 19 वर्षाच्या डुनिथ वेललेजची (Dunith Wellalage) चांगालीच धुलाई केली. डुनिथने 7 षटकात 49 धावा देत दोन विकेट घेतल्या. मॅक्सवेलने सामना जिंकल्यानंतर पदार्पण करणाऱ्या डुनिथजवळ जावून त्याचा उत्साह वाढवला तसेच त्याची पाठ देखील थोपटली. मॅक्सवेलच्या या खिलाडूवृत्तीची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com