IND vs WI : ईडन गार्डन्सवर रात्री पडली 'सुर्याची किरणं'

Suryakumar Yadav
Suryakumar YadavSakal

कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात सुर्याच्या भात्यातून अक्षरश: किरणोत्सार झाल्याचे पाहायला मिळाले. आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यानंतर सुर्यकुमार यादवनं आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवून दिली. त्याने 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय टी-20 मधील त्याचे हे चौथे अर्धशतक असून वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात केलेली 65 धावांची खेळी आतापर्यंतची त्याची सर्वोच्च खेळी ठरली आहे.

सुर्यकुमार यादव पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. सुर्यकुमारच्या खेळीतील वैशिष्ट्य म्हणजे त्याने आपल्या खेळीत एकमेवर चौकार मारला तर 7 उत्तुंग षटकार खचले. डावातील अखेरच्या चेंडूवर तो बाद झाला. पण त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने (Team India) कॅरेबियन संघासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. सुर्यकुमार यादवला व्यंकटेश अय्यरने सुरेख साथ दिली. सुर्याने याआधी न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात 62 धावांची खेळी केली होती. यात त्याने तीन धावांची भर घालत त्याने टी-20 मधील सर्वोच्च खेळी साकारली.

Suryakumar Yadav
CSK ला आठवला धोनीसोबतचा प्रवास; कारण माहितीये?

भारतीय संघाने 66 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या त्यावेळी सुर्युकुमार यादव मैदानात उतरला. दुसऱ्या बाजूला कर्णधार रोहित शर्मा त्याच्यासोबत होता. पण तो धावा करताना संघर्ष करत होता. एक उत्तुंग फटका मारण्याच्या नादात तोही बाद झाला. यावेळी संघाती अवस्था 13.5 षटकात 4 बाद 93 धावा अशी होती. अखेरच्या षटकात सुर्यकुमारनं मोठे फटके खेळले. त्याला व्यंकटेश अय्यरची साथ मिळाली आणि या जोडीनं 37 चेंडूत 91 धावा कुटत संघाच्या धावफलकावर 184 धावा लावल्या.

Suryakumar Yadav
रोहितचा मोठेपणा! स्वत: माघार घेत युवा पोरांना दिली संधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com