जागतिक हॉकी लीग: भारत कॅनडाकडून पराभूत

वृत्तसंस्था
रविवार, 25 जून 2017

कॅनडाचा गोलरक्षक अँतोनी किंडल याने दोन उत्कृष्ट "सेव्ह' केल्यामुळे भारताची निराशा झाली.

लंडन - जागतिक हॉकी लीगच्या उपांत्य फेरीतील सामन्यात आज (रविवार) भारतास कॅनडाकडून 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे भारतास या स्पर्धेत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागणार आहे.

भारताकडून हरमनप्रीत सिंग याने सामन्याच्या 7 व्या व 22 व्या मिनिटांस मिळालेल्या दोन पेनल्टी कॉर्नरवर गोल केले. कॅनडाकडूनही गॉर्डन जॉन्स्टन याने सामन्याच्या 3 ऱ्या व 44 व्या मिनिटास गोल केले. याचबरोबर, केगन परेरा याने सामन्याच्या 40 व्या मिनिटास गोल केला. कॅनडाचा गोलरक्षक अँतोनी किंडल याने दोन उत्कृष्ट "सेव्ह' केल्यामुळे भारताची निराशा झाली.

या विजयाबरोबरच कॅनडाने पुढील वर्षी होणाऱ्या हॉकी विश्‍वकरंडकासाठीही स्थान निश्‍चित केले आहे. हा विश्‍वकरंडक भारतामध्येच होणार आहे.

क्रीडा

लंडन - इंग्लंडकडून पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजचा झालेला पराभव अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या श्रीलंका क्रिकेट संघाच्या...

09.12 AM

कोलकाता : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट लढतीसाठी तयार असलेल्या खेळपट्टीवर गवत आहे. त्याचा फायदा...

07.33 AM

टोकियो : जागतिक अजिंक्‍यपद आणि सिंगापूर सुपर सिरीज स्पर्धेत अंतिम फेरीत समोरासमोर आलेल्या भारताची पी. व्ही. सिंधू आणि जपानची...

06.03 AM