हिना सिद्धूला राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरात सुरु असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत हिनाने 240.8 गुण मिळवीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. ऑस्ट्रेलियाच्या एलेना गालियावोचने रौप्य आणि ऑस्ट्रेलियाच्याच क्रिस्टी गिलमॅनने ब्राँझपदक पटकाविले.

ब्रिस्बेन - भारताची नेमबाज हिना सिद्धू हिने राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक मिळविण्याची कामगिरी केली.

ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरात सुरु असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत हिनाने 240.8 गुण मिळवीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. ऑस्ट्रेलियाच्या एलेना गालियावोचने रौप्य आणि ऑस्ट्रेलियाच्याच क्रिस्टी गिलमॅनने ब्राँझपदक पटकाविले.

हिनाने या महिन्याच्या सुरवातीलाच जितू रायसोबत जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. तर मे महिन्यात याच प्रकरात ब्राँझपदक जिंकले होते. राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत भारतीय नेमबाजांची कामगिरी चांगली झालेली आहे. 10 मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या दीपक कुमारने ब्राँझपदक मिळविले आहे.