...झाला एकदाचा OUT, 4 मॅचनंतर साऊथ अफ्रिकेच्या फिनशरला बाद करण्यात यश

सलग दोन पराभव झालेल्या भारताने तिसऱ्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 48 धावांनी पराभव केला.
 David Miller
David Miller

IND vs SA 3rd T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तीन सामने खेळल्या गेले. सलग दोन पराभव झालेल्या भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 48 धावांनी पराभव केला. भारत या विजयासह मालिकेत कायम आहे. भारताला पहिल्या 2 टी-20 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा स्थितीत तिसरा टी-20 सामना भारतासाठी करा किंवा मरो अशी स्थिती होती. मात्र तिसऱ्या टी-20 मध्ये भारतीय खेळाडूंनी शानदार खेळ दाखवत विजय मिळवला.

फलंदाजीत सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 57 तर इशान किशनने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. भारताकडून हर्षल पटेल 4 तर युझवेंद्र चहलने 3 विकेट घेतल्या. भारतीय गोलंदाजांसाठी सर्वात दिलासादायक गोष्ट म्हणजे डेव्हिड मिलरला जास्त धावा करता आल्या नाहीत आणि तो केवळ 3 धावा करून बाद केले, हर्षलने त्याचा सुंदर चेंडू मिलरला चकमा देत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मालिकेत मिलर बाद होण्याची ही पहिलीच वेळ होती

गुजरात टायटन्सकडून खेळताना तो आयपीएलच्या क्वालिफायर 1 आणि फायनलमध्ये नाबाद राहिला होता. त्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये नाबाद राहिला होता. डेव्हिड मिलरच्या बाद झाल्यानंतर ट्विटरवर क्रिकेट चाहत्यांकडून मजेदार संदेश व्हायरल होत आहे.

डेव्हिड मिलर गेल्या 2 टी-20 सामन्यांमध्ये नाबाद होता, अशा परिस्थितीत जेव्हा हर्षलला तिसऱ्या टी-20मध्ये बाद केले, तेव्हा त्याचा आनंद पाहण्यासारखा होता. चहलला सामनावीराचा किताब देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com