INDvsSL: लंकेसाठी टीम इंडिया म्हणजे 40 वर्षाचं दुखणं

India vs Sri Lanka Test Cricket Records of 40 Years
India vs Sri Lanka Test Cricket Records of 40 YearsESAKAL

भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील दोन कसोटी (Test Series) सामन्यांच्या मालिका 4 मार्चपासून सुरू होत आहे. पहिला कसोटी सामना मोहालीत होणार आहे. ही कसोटी भारतासाठी ऐतिहासिक असणार आहे. कारण भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची ही 100 वी कसोटी (Virat Kohli 100th Test) असणार आहे. तर रोहित शर्मा (Rohit Sharma) पूर्णवेळ कसोटी कर्णधार झाल्यानंतर ही त्याची पहिलीच कसोटी असणार आहे. भारताने जर मोहाली कसोटीत भारताने श्रीलंकेला पराभूत केले तर एक विशेष रेकॉर्ड होणार आहे. (India vs Sri Lanka Test Cricket Records of 40 Years)

India vs Sri Lanka Test Cricket Records of 40 Years
रहाणे-पुजारा जोडीचा दर्जा घसरला; पांड्यासह साहाला BCCI चा दणका

विशेष म्हणजे श्रीलंका भारताबरोबर 1982 पासून कसोटी मालिका खेळत आहे. मात्र त्यांना या 40 वर्षात एकदाही भारतात भारताला पराभूत करता आलेले नाही. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत भारतात 20 कसोटी सामने खेळले गेले आहेत. त्यातील 11 कसोटी भारताने जिंकल्या आहेत तर 9 कसोटी ड्रॉ झाल्या आहेत. श्रीलंका आणि भारत यांच्यात एकूण 44 कसोटी सामने खेळले गेले आहेत. त्यातील 20 भारताने तर 7 श्रीलंकेने जिंकले आहेत तर 17 कसोटी सामने ड्रॉ झाले आहेत.

भारताने जर मोहाली कसोटी जिंकली तर भारताचा हा श्रीलंकेवरचा 21 वा विजय ठरेल. या विजयाबरोबरच टीम इंडिया एक जबरदस्त रेकॉर्ड करणार आहे. भारताने जर लंकेचा पराभव केला तर श्रीलंकेविरूद्ध 21 कसोटी विजय साजरा करणारा पहिला संघ होईल.

India vs Sri Lanka Test Cricket Records of 40 Years
भैय्या भेटूया का? स्टार महिला क्रिकेटरनं शेअर केला विराट किस्सा

भारत - श्रीलंका कसोटी सामन्यातील काही खास रेकॉर्ड्स (India vs Sri Lanka Test Cricket Records)

  • 1997 मध्ये श्रीलंकाने भारताविरूद्ध कसोटी सामन्याच्या एका डावात 6 बाद 952 धावा ठोकल्या होत्या. या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या धावा आहेत.

  • 1990 मध्ये भारतीय संघ श्रीलंकेविरूद्ध 82 धावांवर ऑल आऊट झाला होता. दोन्ही देशांमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यातील ही निच्चांकी धावसंख्य होती.

  • भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) सर्वाधिक धावा केल्या आहेत. सचिनने श्रीलंकेविरूद्ध 1995 कसोटी धावा केल्या आहेत.

  • भारत आणि श्रीलंकेदरम्यान झालेल्या सामन्यात एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सनथ जयसूर्याच्या नावावर आहे. त्याने एका डावात 340 धावा केल्या होत्या.

  • श्रीलंकेविरूद्ध सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम हा सिचन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने लंकेविरूद्ध 9 शतके ठोकली आहेत.

  • भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट या मुथय्या मुरलीधरनने घेतल्या आहेत. त्याने भारताविरूद्ध 105 विकेट घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com