भारतीय संघाने फडकवला तिरंगा; विराटच्या हस्ते ध्वजारोहण

वृत्तसंस्था
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एकत्र येणे प्रथम ध्वजवंदन केले आणि मग विराट कोहलीने ध्वजारोहण केले. सर्वांनी राष्ट्रगीत जणगणमन म्हणून १५ ऑगस्ट साजरा केला. 

कँडी - 70 व्या स्वातंत्र्य दिनाचा आनंद भारतीय क्रिकेट संघाने कँडीच्या इर्ल्स रेगन्सी हॉटेलच्या प्रांगणात साजरा केला. कर्णधार विराट कोहलीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

संपूर्ण संघ त्या बरोबर श्रीलंकेत हजर असलेल्या खेळाडूंच्या पत्नी आणि लहान मुले आणि सपोर्ट स्टाफचे सर्व लोक ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले. खेळाडू आणि स्टाफ संघाच्या अधिकृत काळ्या ट्रॅक सूट आणि वरती पंधरा शुभ्र टीशर्ट घालून कार्यक्रमाला आले होते.

कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एकत्र येणे प्रथम ध्वजवंदन केले आणि मग विराट कोहलीने ध्वजारोहण केले. सर्वांनी राष्ट्रगीत जणगणमन म्हणून १५ ऑगस्ट साजरा केला. 

''आजचा दिवस माझ्या करता डबल मजेचा आहे. कारण एकतर आपला स्वतंत्र्यता दिन आपण साजरा करतोय आणि आज माझ्या वडिलांचा वाढदिवस पण असतो, असे विराट कोहलीने दिवंगत वडिलांची आठवण काढत सांगितले.