ऑस्टेलियाला धक्का, वेगवान गोलंदाज जखमी तर दिग्गज खेळाडूची माघार

ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे.
ऑस्टेलियाला धक्का, वेगवान गोलंदाज जखमी तर दिग्गज खेळाडूची माघार
esakal

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. यादरम्यान, तीन टी20, पाच वनडे आणि दोन टेस्ट खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया टीमला धक्का बसला आहे. संघातील एक वेगवान गोलंदाज जखमी झाला आहे तर दिग्गज खेळाडूने माघार घेतली आहे.

ऑस्टेलियाला धक्का, वेगवान गोलंदाज जखमी तर दिग्गज खेळाडूची माघार
रोहित प्रत्येक वेळी उपलब्ध असेलच असं नाही : राहुल द्रविड

ऑलराउंडर सीन एबॉट नेट्समध्ये जायबंदी झाल्याने श्रीलंका दौऱ्यातून बाहेर पडला आहे. टी २० संघाचा भाग असलेल्या ऍबॉटला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी २० I साठी निवडण्यात आले नाही आणि त्याला दोन 50 षटकांच्या आणि दोन चार दिवसीय सामन्यांसाठी 'A' संघात सामील व्हायचे होते. पण नेटमध्ये फलंदाजी करताना त्याला दुखापत झाली, त्यानंतर तो या दौऱ्यातून बाहेर पडला.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टी-20 साठी एबॉटच्या जागी इतर कोणत्याही खेळाडूचे नाव दिलेले नाही, परंतु त्याच्या जागी 'अ' संघात स्कॉट बोलंडला बोलावण्यात आले आहे.

ऑस्टेलियाला धक्का, वेगवान गोलंदाज जखमी तर दिग्गज खेळाडूची माघार
टीम इंडियामध्ये दिनेश कार्तिकचा रोल काय असेल? द्रविडने दिले उत्तर

पीटर हँड्सकॉम्बनेही आपले नाव मागे घेतले

दरम्यान, पीटर हँड्सकॉम्बने देखील आपल्या गर्भवती पत्नीसोबत राहण्यासाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावरून परतण्याचा निर्णय घेतला आहे. हँड्सकॉम्बच्या जागी क्वीन्सलँडचा यष्टिरक्षक जिमी पिअरसनचा अ संघात समावेश करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियन संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. येथे त्याला तीन टी-२०, पाच वनडे आणि दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. या दौऱ्यातील पहिला टी-२० सामना ७ जून रोजी खेळला गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com