ज्योती चौहानला अर्धमॅरेथॉनचे सुवर्ण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

नागपूर - मूळ नागपूरची, पुण्यात सराव करणारी आणि मंगलोर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्योती चौहानने रविवारी संपलेल्या 77 व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ऍथलेटिक्‍स स्पर्धेत महिलांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक जिंकले. हे तिचे या शर्यतीतील दुसरे सुवर्णपदक होय. दोन वर्षांपूर्वी मंगलोर येथेच झालेल्या स्पर्धेत नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना ज्योतीने सुवर्ण जिंकले होते. स्पर्धेत मंगलोर विद्यापीठाने 178 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. 

पुरुषांत चारशे मीटर हर्डल्स शर्यतीत 50.81 सेकंदाचा स्पर्धा विक्रम करणाऱ्या मंगलोरचा ए. धारुण आणि महिलांत पाच व दहा हजार मीटर शर्यतीत विक्रमासह जिंकणारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची संजीवनी जाधव सर्वोत्कृष्ट ऍथलिट ठरले. महात्मा गांधी विद्यापीठाला 84 गुणांसह दुसरे स्थान मिळाले. महिलांत महात्मा गांधी विद्यापीठाने विजेतेपद मिळविले. 

महिलांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये ज्योतीने सुरवातीपासूनच आघाडी घेतली होती. मार्ग थोडा अवघड असला, तरी तिच्या कामगिरीवर परिणाम झाला नाही आणि तिने 1 तास 17 मिनिटे 01 सेकंदांत शर्यत जिंकली. या कामगिरीमुळे तिची यंदा होणाऱ्या विश्‍वविद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी निवड निश्‍चित मानली जात आहे. 

पुरुषांत दहा हजार मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकणाऱ्या रणजितकुमार पटेलने गतविजेत्या मंगलोर विद्यापीठाच्या कांतिलाल कुंभारला मागे टाकीत 1 तास 06 मिनिटे 37 सेकंदात सुवर्णपदक पटकाविले. नाशिकच्या असलेल्या कांतिलालला 1 तास 07 मिनिटे 07 सेकंदात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 

क्रीडा

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क दुखापतीतून अद्याप पूर्ण तंदुरुस्त झाला नसल्याने आगामी भारत...

01.45 PM

दिल्लीचा विजय, तर गुजरातची बरोबरी अहमदाबाद - घरच्या मैदानावर गुजरात फॉर्च्युन जाएंट्‌सला आपली विजयी मालिका अखेरच्या दिवशी कायम...

10.51 AM

मुंबई - ऑस्ट्रेलियातील प्रसार माध्यमे विराट कोहलीबद्दल सतत टीका करत असली, तरी माझ्यासह त्याचे ऑस्ट्रेलियात असंख्य चाहते असल्याचे...

10.51 AM